दूध साखरेचे दर जैसे थे, मग मिठाईच महाग का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:16+5:302021-09-16T04:17:16+5:30
यंदा घराघरात गणेशमुर्तीची स्थापन केली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ उत्सव उत्साहात साजरा केल्या जात आहे. याचा ...
यंदा घराघरात गणेशमुर्तीची स्थापन केली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशउत्सव मंडळ उत्सव उत्साहात साजरा केल्या जात आहे. याचा काळात गैरफायदा घेवून शहरातील काही मिठाईविक्रेत्यानी गणेशउत्सवात मिठाइचे दर वाढविल्याचे निरदर्शनास आले आहे. साखरेचे व दुधाचे दर मात्र जैसे-थे असताना मिठाईचे दर कसे वाढविले असा सवाल ग्राहकांचा आहे.
उत्सव काळात शहरात हजारो किलो लाखो रुपयांच्या मिठाईची विक्री केली जाते. या मात्र कमी दर्जाचे दुध, खवा वापरणे मिठाईत भेसळ करण्याचे प्रमाणही या दिवसात वाढते.
मिठाईचे दर (प्रति किलो)
मिठाइचा प्रकार सध्याचा दर गणेशोउत्सवाअधीचा दर
पेढा ३६० ३००
बर्फी ४०० ३८०
केशरपेढा ४४० ४००
चॉकलेट बर्फी ४०० ३८०
कोट
यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोविड नियमावलीचे पालन करावे लागते. तसेच जास्त दिवस मिठाई ठेवता येत नाही. सर्वत्र महागाई वाढली आहे. त्यामुळे मिठाईचे थोडे दर वाढविले.
एक मिठाई विक्रेता
कोट
गणेशउत्सवापुर्वी मिठाईची जास्त विक्री होत नाही. त्यामुळे दर थोडे कमी होते. मात्र दहा दिवस व नवरात्रउत्सवात मिठाईला मागणी असते. आम्ही भेसळ करीत नाही. त्यामुळे किलो मागे फक्त दहा ते २० रूपये वाढविले आहेत.
एक मिठाई विक्रेता
बॉक्स:
भेसळीकडे लक्ष असून द्या
मिठाई तयार करताना कमी दर्जाचा खवा वापरणे, किंवा रंगबेरंगी मिठाई तयार करताना विविध कलरचा वापर करणे नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणून अन्न व प्रशासन विभागाने याकडे लक्ष देवून मिठाई विक्रेत्यांकडून मिठाईचे नमुने घ्यावे दोषी आढळल्यास कारवाई करावी.
बॉक्स:
दरावर नियंत्रण कुणाचे?
मिठाईचे दर वाढविले जाते त्यावर एफडीएचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कमी दर्जाच्या खवा वापरणे मिठाईच्या ठिकाणी बेस्ट बिफोरचे स्टीकर नसणे आम्ही कारवाई करीत असल्याचे अन्न विभागाने सांगितले.
कोट
मिठाईमध्ये भेसळ केली जात असेल तर आमची दिवाळीपर्यंत तपासणी मोहीम सुरु आहे. मिठाईचे नमुने घेवून ते तपासणीला पाठविले जातात.
शरद कोलते, सह आयुक्त अन्न
कोट
गत वर्षीच्या तुलनेत मिठाईचे दर वाढले आहे. मात्र आम्ही एक ते दोन किलो मिठाई विकत घेतो त्यामुळे दर कळत नाही. मात्र हजारो ग्राहक जेव्हा चढ्यादराने मिठाई घेतात तेव्हा व्यवसायिकांकडून लोखोंची लुट होते.
एक ग्राहक