दुधाळ जनावरांना 'युनिक आयडी कोड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 09:05 PM2017-08-27T21:05:15+5:302017-08-27T21:05:57+5:30

प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला.

Milk animals 'unique ID code' | दुधाळ जनावरांना 'युनिक आयडी कोड'

दुधाळ जनावरांना 'युनिक आयडी कोड'

Next
ठळक मुद्दे'टॅग' लावण्यात अमरावती 'टॉपर' : पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला. आता जनावरांच्या ओळखीसाठी दुधाळ जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' देण्यात येत असून त्यासाठी जनावरांना 'टॅग' लावण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यात २४० जनावरांना आतापर्यंत 'टॅग' लावण्यात आले आहेत. यामध्ये अमरावती जिल्हा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत प्रथम क्रमांकावर आहे. केंद्र शासनाने नागरिकांना आधार ओळखपत्र दिले आहे. त्यानुसार प्रत्येकाच्या वैयक्तिक माहितीचा इत्यंभूत डाटा तयार झाला आहे. त्याचप्रमाणे आता दुधाळ जनावरांपैकी गाय व म्हशी वर्गातील जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' दिला जात आहे. जिल्ह्यात १६८ पशुवैद्यकीय चिकित्सालयातील प्रमुखांकडे गायी व म्हशींना 'टॅग' लावण्याचे काम सोपविण्यात आले आहे. टॅग लावलेल्या जनावरांची इत्यंभूत माहिती शासनाकडे आॅनलाईन पाठवावी लागत आहे. ‘डाटा अपलोड' करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला 'इनॉफ' साफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाने तुर्तास ५६ हजार टॅग उपलब्ध करून दिले आहेत. जूनपासून आतापर्यंत २४० जनावरांना टॅग लावण्यात आले आहेत. यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती दुधाळ जनावरे आहेत व कोणत्या जनावरांची प्रजननक्षमता सर्वाधिक आहे, ही माहिती शासनाला मिळेल. जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पशुधन विकास अधिकारी आर.एस.अलोणे यांना ही जबाबदारी दिली आहे.
कामाचा ताण वाढला
शासनाने नवा उपक्रम सुरू केला. मात्र, तेवढ्याच मनुष्यबळाला नियमित कामे करून 'टॅग' लावण्याचे काम करावे लागत आहे. जनावर पालकांना भेटून 'टॅग' लावण्याचे काम वाढल्यामुळे अधिकारी, कर्मचाºयांवर ताण वाढला आहे. टॅग लावल्यानंतर त्याबाबतची इत्यंभूत माहिती आॅनलाईन 'अपलोड' करावी लागत आहे. मात्र, शासनाकडून ‘डाटा एन्ट्री आॅपरेटर’ देण्यात आलेला नाही.

दुधाळ जनावरांनाही आयडी कोड दिला जात आहे. त्यासाठी गाय व म्हशी वर्गातील जनावरांना टॅग लावून माहिती शासनाला पाठविली जात आहे. यात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
- मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

Web Title: Milk animals 'unique ID code'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.