दुधाळ पशू अल्प किमतीत विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:52+5:302021-05-23T04:11:52+5:30
फोटो पी २२ पोहरा पोहरा बंदी : अमरावती शहराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या पोहरा परिसरातून दुधाळ पशुंची संख्या लक्षणीय ...
फोटो पी २२ पोहरा
पोहरा बंदी : अमरावती शहराला दुधाचा पुरवठा करणाऱ्या पोहरा परिसरातून दुधाळ पशुंची संख्या लक्षणीय घटली आहे. चाऱ्याच्या अडचणीमुळे पशुपालकांनी अल्प किमतीत ती जनावरे विक्रीला काढली आहे. त्यातच दुधाचे दर अनेक वर्षांपासून स्थिर असल्याने पूरक उत्पन्नही घटले आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक घरी गाय, म्हैस, बैल, शेळी व व इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी होती. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पाळीव प्राणी पाळायचे. बेरोजगारीवर मात करण्यासाठी अनेकांनी सुरू केलेले पशूपालन व दुग्ध व्यवसाय भरभराटीस आला होता. एका गुराख्याकडे चराईसाठी जाणाऱ्या गुरांची संख्या दोनशे ते अडीचशेच्या आसपास असायची. या व्यवसायातून गुराख्याला मोठा रोजगार मिळायचा. आजच्यासारखी चारा व पाणी टंचाई पूर्वी नव्हती. हिरवा चारा मुबलक मिळायचा, परंतु हे चित्र आता इतिहासजमा झाल्याने काही वर्षांत चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहे. दुधाचे दर मात्र वाढत नसल्याने जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे पशुपालकांनी पशुधन विक्रीला काढली असून, जनावरांची अल्प किमतीत विक्री होत आहे.
बॉक्स
चारा कुठे आहे?
पोहरा परिसरात चारही बाजूला वनविभागाचे जंगल परिसर असल्याने जनावरांसाठी चारा राहिलेला नाही. तसेच पाण्याची पातळी कमी झाल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. या चारा, पाणी टंचाईने दुग्ध व्यवसाय धोक्यात आल्याने पशुपालकांवर पशुधन विक्रीची वेळ आली आहे.