लाखोंचे धनादेश परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 11:23 PM2017-11-05T23:23:16+5:302017-11-05T23:23:27+5:30
गुरुनानक जयंतीच्या उत्सवादरम्यान वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाºया एका वाहतूक पोलिसाला धनादेश असलेली बॅग सापडली आणि त्याने माणुसकीचा परिचय देत लाखो रुपयांच्या धनादेशाने भरलेली ती बॅग.....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गुरुनानक जयंतीच्या उत्सवादरम्यान वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळणाºया एका वाहतूक पोलिसाला धनादेश असलेली बॅग सापडली आणि त्याने माणुसकीचा परिचय देत लाखो रुपयांच्या धनादेशाने भरलेली ती बॅग संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचली.
पश्चिम विभागाचे वाहतूक पोलीस शिपाई प्रदीप शहाणे शनिवारी सायंकाळी गुरुनानक जयंतीच्या पर्वावर राजापेठ रेल्वे फाटकाजवळ कर्तव्य बजावत होते. दरम्यान सायंकाळी रेल्वेफाटकाजवळ एक बेवारस स्थितीत त्यांना बॅग पडलेली आढळून आली. त्यांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एका बँकेचे दोन चेक बुक आढळून आले. त्यापैकी एका चेकबुकमधील विविध चेकवर लाखों रुपयांची रोखीची नोंद असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी माहिती काढून संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. या चेकबुकसंदर्भात राजापेठ पोलिसांना माहिती दिली. त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो क्रमांक चावला नावाच्या बिझिलॅन्डमधील व्यापाºयाचा असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चावला यांना राजापेठ ठाण्यात बोलावून त्यांच्या आधार कार्डची तपासणी केली आणि चेक त्यांच्या स्वाधीन केले.
शहाणे यांनी दाखविलेल्या माणुसकीबाबत पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी त्यांचे कौतुक केले असून त्यांना रिवार्ड मिळावा, यासाठी ते वरिष्ठ अधिकाºयांकडे शिफारस करणार आहेत.