गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मार्केटमध्ये लाखोंची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:18 AM2021-09-10T04:18:08+5:302021-09-10T04:18:08+5:30
कोरोनामुळे बाजारपेठेत गर्दी ओसरली होती. मात्र, गणेशोत्सवामुळे नागरिकांमध्ये उत्साह संचारला असून, घराघरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ विविध वस्तू, पूजेला ...
कोरोनामुळे बाजारपेठेत गर्दी ओसरली होती. मात्र, गणेशोत्सवामुळे नागरिकांमध्ये उत्साह संचारला असून, घराघरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ विविध वस्तू, पूजेला लागणाऱ्या साहित्य खरेदीकरिता मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, तरुणी बाहेर पडल्याने बाजार मोठी गर्दी उसळली. यातून लाखोंची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
मातीच्या मूर्तीला पसंती
नेहरू मैदानात एकूण ४५ स्टॉल लागले असून त्यात २५ दुकानांत मातीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दिसायला आकर्षक असल्या तरी त्या पाण्यात विरघळत नसल्याने प्रदूषणवाढीला कारणीभूत ठरत असल्याने नागरिकांनी मातीच्या मूर्ती खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले.
------
मूर्तीसोबत अन्य वस्तूंची दुकाने
गणेशोत्सवात लागणाऱ्या पूजेच्या साहित्यासह मूर्ती सजावटीचे साहित्य विक्रीची दुकानेही सजली आहेत. यामध्ये रुद्राक्षाची माळ, मोत्याची माळ, फुलमाल, मोगरा फुलाची माळ, कमळाची माळ, मुकुट, तोरण, सिरीज, आकर्षक लायटिंग, कलरफुल दिव्यांना विशेष मागणी दिसून आली.
कोट
यंदा सर्वच महागल्याने एक फुटाची मूर्ती ५०० रुपये, दीड फुटाची ७०, तर २ फुटाची १५०० ते २००० रुपयांपर्यंत किंमत ठेवली आहे. मात्र, भाविकांकडून खरेदीला प्रोत्साहन कमी मिळत आहे.
- कार्तिक रोतडे, मूर्तिकार