‘मिलिपीड'मुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:10+5:30
चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पूर्णा : चांदूर बाजार तालुक्यात पेरणी केलेल्या बियाण्यांना अंकुर आले खरे; परंतु, अंकुर खाऊन टाकणाऱ्या मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीने आसेगावपूर्णा परिसरात उच्छाद मांडला आहे. या अळीच्या प्रादुभार्वामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर दुसरीकडे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस पिकाचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जातात. सध्या पेरणीची लगबग सुरू असताना आसेगाव पूर्णा शिवारात या अळ्यांच्या मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या भागात जवळपास शेकडो एकर परिसरात मिलिपिडी प्रजातीच्या अळ्या दिसून येत आहेत. त्यामुळे नुकतेच अंकुरलेल्या खरीप पिकांना त्यांच्यापासून धोका निर्माण झाला आहे. शेतात दिसणाºया गोगलगायसदृश अळीने शेतकºयांना 'सळो की पळो' करून सोडले आहे. ही अळी जवळपास अडीच ते तीन इंच लांब आकाराची असून, तिला ग्रामीण भागात पैसा या नावाने ओळखले जाते. शेतकºयांना मोठ्या उत्पन्नाची आशा असताना दरवर्षी या अळीमुळे उत्पन्न निम्म्यावर येत आहे.
तीन - चार वर्षांपासून या मिलिपिड (पैसा) अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या अळ्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
उपाय करूनही यावर नियंत्रण येत नाही. त्यांनी सोयाबीन, कापूस यासह तेलवर्गीय पिकांना लक्ष्य केले असून, त्यांचे मुख्य खाद्य पाला व शेंगा हे असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
- राजेंद्र नवले,
शेतकरी, आसेगाव पूर्णा
एकीकडे दोन-तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, दुसरीकडे पैसा अळीने पिकावर आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी कृषी विभागाने संशोधन करून ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या उत्पादनापासून वंचित रहाावे लागेल.
- मोहन नेरकर,
शेतकरी, आसेगाव पूर्णा