मीनल लाहोटी, सुयश इंगोले, प्राची उदासी अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:58 PM2018-05-30T22:58:13+5:302018-05-30T22:58:38+5:30

फेब्रुवारी, मार्च-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत १२ वी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची मीनल लाहोटी, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा सुयश इंगोले व समर्थ हायस्कूलची प्राची उदासी यांनी ६५० पैकी ६३४ गुण (९७.५३ टक्के) मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

Minal Lahoti, Suyash Ingole, Prachi Udasi topper | मीनल लाहोटी, सुयश इंगोले, प्राची उदासी अव्वल

मीनल लाहोटी, सुयश इंगोले, प्राची उदासी अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देसावित्रीच्या लेकींची गगनभरारी : शिवाजी विज्ञान, केशरबाई लाहोटी, समर्थची मुसंडी; वरूड प्रथम, तर चिखलदरा माघारला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फेब्रुवारी, मार्च-२०१८ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत १२ वी परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजता आॅनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची मीनल लाहोटी, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा सुयश इंगोले व समर्थ हायस्कूलची प्राची उदासी यांनी ६५० पैकी ६३४ गुण (९७.५३ टक्के) मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक स्थानिक श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचा सार्थक राठी याने पटकाविला. त्याला ६२४ गुण (९६ टक्के) मिळालेत. तृतीय क्रमांकाची मानकरीदेखील ब्रजलाल बियाणीची विद्यार्थिनी साक्षी इंगोले ठरली. तिने ९५.८५ टक्के गुण मिळविले.
जिल्ह्यातून प्रथम येण्याचा सन्मान यंदा केशरबाई लाहोटी महाविद्यालय, श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय व समर्थ हायस्कूलला मिळाला असला तरी यंदाचा निकालात श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाने निकालात मुसंडी मारल्याचे चित्र आहे. ५०१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एका विद्यार्थ्यांचे आकस्मिक निधन झाले. परिणामी ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या निकालाची टक्केवारी ९९.३७ इतकी तर केशरबाई लाहोटी वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल ९९.१५ टक्के लागला आहे. विद्याभारती विज्ञान महाविद्यालयाची निकालाची टक्केवारी ९४.३३ इतकी आहे.
मणिबाई गुजराती हायस्कूल विज्ञान शाखेची एकूण टक्केवारी ९७.२६ इतकी आहे. गणेशदास राठी वाणिज्य महाविद्यालय ९४.८० टक्के, रूरल इन्स्टिट्यूटचा निकाल ९८.२५ टक्के लागला आहे. विदर्भ विज्ञान महाविद्यालयाचा निकाल ८६.०२ टक्के लागला आहे. निकालावर यंदाही मुलींचाच वरचष्मा दिसून आला.
निकालावर यंदाही मुलींचीच छाप
निकालावर यंदाही मुलींचाच वरचष्मा असून, जिल्ह्यातून मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ९२.०६, तर मुलांची ८३.२८ टक्के आहे. फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये झालेल्या बारीच्या परीक्षेत जिल्ह्यातून १९,३१८ मुलांनी, तर १७,६८४ मुलींनी नोंदणी केली होती. एकूण ३७,००२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. पैकी १९,३०५ मुलांनी, तर १७,६६८ मुलींनी परीक्षा दिली. एकूण ३६,९७३ विद्यार्थ्यांपैकी १६,०७८ मुले व १६,२६६ मुली उत्तीर्ण झाल्यात. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ३२, ३४४ आहे. या आकेडवारीनुसार उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.२८, तर मुलींची टक्केवारी ९२.०६ इतकी आहे.

Web Title: Minal Lahoti, Suyash Ingole, Prachi Udasi topper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.