नगर परिषद अभियंत्याने तयार केली किमान खर्चाची सफाई मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 07:50 PM2018-08-25T19:50:55+5:302018-08-25T19:51:17+5:30
मोर्शी येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी शहरातील रस्ते झाडण्याकरिता किमान खर्चातून अनोख्या मशीनचा आविष्कार केला आहे.
अमरावती - मोर्शी येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी शहरातील रस्ते झाडण्याकरिता किमान खर्चातून अनोख्या मशीनचा आविष्कार केला आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचरा संकलन, वाहतूक व प्रक्रियेकरिता राष्ट्रीय स्तरावर क्रमांक ठरविण्यात येणार असून शासन यादृष्टीने होणा-या प्रगतीच्या अनुषंगाने शहरांना स्टार रेटींग देण्यात येणार आहे. त्यात संपूर्ण शहरातील नागरी तसेच वाणिज्यिक क्षेत्रे दिवसातून दोन वेळा झाडल्यास शहराला उच्चतम स्टार रेटिंग मिळणार आहे. परंतु, नगरपरिषद मोर्शी स्वच्छतेच्या कामाकरिता केवळ १०-१२ कर्मचारी उपलब्ध आहेत. या मनुष्यबळाला साहाय्य करण्यासाठी अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी झाडण्याचे यंत्र तयार केले. स्वच्छ महाराष्टÑ अभियानाच्या राज्य संचालकांनी मोर्शी शहरातील स्वच्छतेसंबंधी २३ आॅगस्ट रोजीच्या दौºयाच्या वेळी सदर आविष्कारासाठी त्यांचे कौतुक केले.
सदर यंत्र तयार करण्याकरिता त्यांनी भंगारमध्ये उपलब्ध झालेल्या जुन्या आॅटोच्या डिफरंशियल असेंब्लीचा वापर करून स्थानिक कारागिरांची मदत घेतली. ही मशीन अधिकतम २० हजार रुपयांत तयार होऊ शकते. आठ ते दहा मजुरांचे काम ही एकटी मशीन करू शकते. त्यामुळे झाडण्याच्या कामावर होणाºया अतोनात मासिक खर्च वाचणार आहे. ऋषीकेश देशमुख यांनी मशीनकरिता अध्यक्ष शीला रोडे व मुख्याधिकारी वसंत इंगोले यांचे पाठिंब्यासाठी आभार मानले तसेच राज्यातील सर्व नगर परिषदांतील अभियंत्यांनी सदर मशीन तयार करून वापरण्याचे आवाहन केले.