राज्यमंत्री बच्चू कडूंचा कोविड सेंटरमध्ये मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:15 AM2021-06-09T04:15:20+5:302021-06-09T04:15:20+5:30

अमरावती : राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथील कोविड सेंटरमध्ये एक दिवस ...

Minister of State Bachchu Kadu stays at Kovid Center | राज्यमंत्री बच्चू कडूंचा कोविड सेंटरमध्ये मुक्काम

राज्यमंत्री बच्चू कडूंचा कोविड सेंटरमध्ये मुक्काम

Next

अमरावती : राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांदूर बाजार येथील कोविड सेंटरमध्ये एक दिवस मुक्काम करीत रुग्णांमध्ये विश्वास जागविला. हा प्रसंग कोरोना रुग्णांसाठी अविस्मरणीय ठरला.

कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे काही नाही. वेळीच उपचार व आवश्यक दक्षता घेतली, तर कोरोनावर मात करता येते. आपण स्वत:ही या आजारावर मात केली आहे. आत्मविश्वास कुठेही हरवता कामा नये. आत्मविश्वासाने उपचारांना प्रतिसाद मिळतो व व्यक्ती बरी होते, अशा शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येकाची विचारपूस केली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी सर्वांना जेवणदेखील दिले. नितीन कोरडे, अब्दुल रहमान, मुझफ्फर हुसेन, गणेश पुरोहित, सचिन खुळे, शिशिर माकोडे, मोहम्मद जावा, दिनेश कथे, गोलू ठाकूर, संजय गोमकाळे, सलीम सरकार, राजेश पखाले, दीपक भोंगाडे, मयूर ठाकरे, उमेश कपाळे, ऋषभ गावंडे, आबू वानखडे यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी व प्रहार कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Web Title: Minister of State Bachchu Kadu stays at Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.