अनाथ भावंडाच्या भेटीसाठी इनायतपुरात पोहचले जलसंपदा राज्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:59+5:302021-07-04T04:09:59+5:30

चांदूर बाजार : तालुक्यातील इनायतपूर येथील अनाथ बहीणभावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण, महिला व ...

Minister of State for Water Resources arrives in Inayatpur to visit orphans | अनाथ भावंडाच्या भेटीसाठी इनायतपुरात पोहचले जलसंपदा राज्यमंत्री

अनाथ भावंडाच्या भेटीसाठी इनायतपुरात पोहचले जलसंपदा राज्यमंत्री

Next

चांदूर बाजार : तालुक्यातील इनायतपूर येथील अनाथ बहीणभावाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास, जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शनिवारी सांगितले. त्यांनी इनायतपूर येथे अनाथ भावंडांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

इनायतपूर येथील राजेश सुधाकर धोंडे यांचे सन २०११ मध्ये आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी व दोन्ही मुलांची आई वैशाली राजेश धोंडे यांचे १६ मे २०२१ रोजी कोरोनाने निधन झाले. त्यामुळे जागृती व सुशांत ही बालके अनाथ झाली. या दोन्ही मुलांचा आजी व आजोबा सांभाळ करीत आहेत. तथापि, त्यांचे वय व परिस्थिती पाहता या भावंडांच्या संगोपनासाठी सर्व मदत केली जाईल. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च आपण उचलणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जाहीर केले.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांसाठी संगोपन योजनाही राबविण्यात येत आहे. त्याचा गरजू बालकांना लाभ मिळवून द्यावा, असेही निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

यावेळी प्रहारचे पदाधिकारी दीपक भोंगाडे, राहुल धोंडे, विष्णू घोम, पोलीस पाटील अमोल घोम, पोलीस पाटील जयश्री धोंडे, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वल धोंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Minister of State for Water Resources arrives in Inayatpur to visit orphans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.