जेव्हा मंत्री यशोमती ठाकूर स्वत: ट्रॅक्टर चालवितात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 01:59 PM2022-04-16T13:59:18+5:302022-04-16T14:28:27+5:30
मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रॅक्टरचे स्टेरिंग स्वतः हातात घेत शेतकरी उत्थान तंत्रज्ञानाच्या आणि विकासाच्या मार्गावर आपण चालत असल्याचे दाखवून दिले.
अमरावती : राज्यात भोंग्यावर राजकारण सुरू असताना, अमरावतीत मात्र शेतकरी उत्थान तंत्रज्ञानाचे समाजकारण पाहायला मिळते आहे. आज अमरावतीत पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर चक्क स्वत: ट्रॅक्टरचे सारथ्य करताना पाहायला मिळाल्या.
शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या ट्रॅक्टरची प्रथम चाचणी घेत त्यांनी ट्रॅक्टरचे सारथ्य केले. ब्राह्मणवाडा( भगत) येथील युवा शेतकरी सरकारी बचत गटाच्यामाध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रॅक्टरचे स्टेरिंग स्वतः हातात घेत शेतकरी उत्थान तंत्रज्ञानाच्या आणि विकासाच्या मार्गावर आपण चालत असल्याचे दाखवून दिले आहे.
जेव्हा मंत्री यशोमती ठाकूर स्वत: ट्रॅक्टर चालवितात...https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/X9p3XcoZEe
— Lokmat (@lokmat) April 16, 2022
दरम्यान, काल वाशिम दौऱ्यावर असतानाही मंत्री ठाकूर यांनी खेडा येथील एका रसवंतीजवळ त्यांनी आपली गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंती जवळ येऊन आणि उसाचा रस पिऊन उन्हाच्या झळांपासून होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. ठाकूर यांनी या रसवंती चालकाची विचारपूस केली. त्याच्या शैक्षणिक आणि कौटुंबिक परिस्थितीची माहिती घेतली. तसेच त्याला काही अडचण असल्यास संपर्क करण्याचे आश्वासन देत त्या पुन्हा आपल्या दौऱ्यावर मार्गस्थ झाल्या. मात्र, ऐन उन्हात मंत्र्यांचा असा पाहुणचार करायला मिळाल्याने आणि त्यांनी दाखवलेल्या सहानभूतीमुळे रसवंतीचालक आनंदून गेला होता.