धक्कादायक! चुलतभावाकडून अत्याचार, अल्पवयीन गर्भवती

By प्रदीप भाकरे | Published: February 10, 2023 05:23 PM2023-02-10T17:23:42+5:302023-02-10T17:30:41+5:30

आरोपी अकोल्यातील : शहर कोतवाली पोलिसांनी दाखल केला गुन्हा

minor gets impregnant after being Sexually abused by 19-year-old cousin | धक्कादायक! चुलतभावाकडून अत्याचार, अल्पवयीन गर्भवती

धक्कादायक! चुलतभावाकडून अत्याचार, अल्पवयीन गर्भवती

googlenewsNext

अमरावती : चुलतभावाने केलेल्या शारीरिक अत्याचारातून एक अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना ९ फेब्रुवारी रोजी येथील शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. याप्रकरणी अकोट तालुक्यातील एका १९ वर्षीय आरोपीविरूद्ध बलात्कार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यातील पीडिता व आरोपी हे परस्परांचे चुलत भाऊ बहीण आहेत. काही महिन्यांपुर्वी तिला गाठत तू माझी बहीण आहेस, हे मला माहित आहे, पण तरीही तू मला खुप आवडतेस, मी तुझ्यावर खुप प्रेम करतो, अशी बतावणी त्याने केली. त्यावर तिने नकार दिला. मात्र त्यांच्यात तेव्हापासून प्रेम संबंध निर्माण होऊन दोघांमध्ये मोबाईल कॉलिंग सुरू झाली. सुमारे चार महिन्यांपुर्वी ऑक्टोबर २०२२ च्या सुमारास तू मला खुप आवडतेस, असे म्हणून आरोपीने तिला धमकी दिली. तथा तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. गर्भधारणा झाल्यानंतर ही बाब तिने आई व आजीला सांगितली.

अशी झाली उकल

दरम्यान, कुटुंबीय मारतील, या भीतीने ती बाब तिने कुणालाही सांगितली नाही. मात्र, ६ फेब्रुवारी रोजी शाळेतून परत येत असताना तिला स्वत:त काही शारीरिक बदल जाणवले. त्यामुळे ७ फेब्रुुवारी रोजी ती मैत्रिणीसह एका स्थानिक दवाखान्यात तपासणीसाठी गेली. त्यावेळी तिला तीन महिन्यांची गर्भधारणा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तथा पोलीस केस करण्यास सुचविले. त्याबाबत कोतवाली पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. त्यानुसार ९ फेब्रुवारी रोजी पिडिताने आईसह शहर कोतवाली ठाणे गाठले. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयान नोंदवून घेत गुरूवारी रात्री १० च्या सुमारास गुन्हा दाखल केला.

Web Title: minor gets impregnant after being Sexually abused by 19-year-old cousin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.