अल्पवयीन मुलीला बलात्कारातून गर्भधारणा; अमरावतीतील धक्कादायक घटना
By प्रदीप भाकरे | Published: November 18, 2022 04:43 PM2022-11-18T16:43:17+5:302022-11-18T16:48:08+5:30
डॉक्टरच्या तपासणीमध्ये प्रकार उघड
दर्यापूर (अमरावती) : एका १५ वर्षीय अल्पवयीन मुुलीला बलात्कारातून गर्भधारणा झाल्याची धक्कादायक घटना दर्यापूर येथे उघड झाली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी १७ नोव्हेंबर रोजी आरोपी शब्बीर पठाण (रा. गांधीनगर, दर्यापूर) याच्याविरुद्ध बलात्कार, जिवे मारण्याची धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली.
सप्टेंबर महिन्यात ती १५ वर्षीय मुुलगी घरात एकटी असताना आरोपी तिच्या घरात शिरला. तिच्यावर जबरदस्ती केली. वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची तपासणी केली असता, डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे निदान केले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.
पीडिता ही दर्यापूर येथे भाडेकरू म्हणून राहत होती. यादरम्यान गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करताच आरोपी शब्बीर पठाण याला अटक करण्यात आली. यात अन्य एका जणाचा आरोपी म्हणून समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले