‘त्या‘ अल्पवयीन मुलीचा अध्यापही शोध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:26+5:302021-07-24T04:10:26+5:30

दत्तापुर पोलिसांनी केला दोन आरोपीवर गुन्हा दाखल आरोपितांची जेल रवानगी धामणगाव रेल्वे : त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळून ...

‘That’ minor girl is still undiscovered | ‘त्या‘ अल्पवयीन मुलीचा अध्यापही शोध नाही

‘त्या‘ अल्पवयीन मुलीचा अध्यापही शोध नाही

Next

दत्तापुर पोलिसांनी केला दोन आरोपीवर गुन्हा दाखल

आरोपितांची जेल रवानगी

धामणगाव रेल्वे : त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळून नेल्याच्या प्रकरणात दत्तापूर पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा नोंदविला. मात्र, अध्यापही सदर मुलीचा शोध लागलेला नसल्याने दत्तापूर पोलिसांचे दोन्ही पथक निकामी ठरले आहे.

जुना धामणगाव परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना २० जुलै रोजी घडली. ३ वर्षांपूर्वी तिच्या आईवर झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात साक्ष कामी अमरावती येथे गेलेल्या आईची प्रकृती बिघडल्याचे सांगून शहरातील शास्त्री चौक परिसरातील सिंधी मोहल्ला येथून फिकट रंगाच्या व्हॅनमध्ये बसवून तीन मुलांनी तिला पळवून नेल्याची तक्रार कुटुंबाने दत्तापूर पोलिसात नोंदवली होती. घटनेत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक द्वारका आंबोरे यांनी २२ जुलै रोजी दोन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून गुन्हा दाखल केला. दत्तापूर पोलिसांच्या माहितीनुसार यातील आरोपी आकाश गोपाल शर्मा (२०, रा.मार्केट चौक दत्तापूर) व अमर योगेश अठोर (२१, रा.तिवरा) यांनी सदर पीडितेवर बळजबरी करण्याच्या उद्देशाने अपहरण केले. रेल्वे मालधक्क्याच्या मागे निर्जनस्थळीं नेल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा तांत्रिक पुरावा सीसीटीव्हीत दिसून येत असून घटनेतील फोन कॉलच्या सीडीआर रेकॉर्डवरून समोर आले आहे. दरम्यान, २३ जुलै रोजी यातील दोन्ही आरोपींना धामणगाव रेल्वे न्यायालयाने जेलमध्ये रवानगीचे आदेश दिले. मात्र अद्यापही त्या अल्पवयीन मुलीचा शोध न लागल्याने ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक शिवशंकर खेडेकर यांच्या पथकातील उमेश वाघमारे, सचिन गायधने, अमोल बनुवाकोडे यांचे पथक शोधकार्यासाठी रवाना झाले आहेत.

अल्पवयीन मुलीच्या शोधार्थ पथक रवाना केले आहेत. सीडीआर, लोकेशन व शहरातील सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा तपासले जात असून पुढील तपास सुरू आहे.

- शिवशंकर खेडेकर,

सहायक पोलिस निरीक्षक, दत्तापूर पोलीस स्टेशन

Web Title: ‘That’ minor girl is still undiscovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.