अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:11 AM2021-07-26T04:11:30+5:302021-07-26T04:11:30+5:30

---------- ७० हजारांचा कृषी औजार लंपास अचलपूर : तालुक्यातील मौजे खेलतपमाडी शिवारातून ट्रॅक्टर फंटन, मोगडा, नांगर, बैलगाडीचे चाक, थ्रेशर ...

The minor girl was lured away | अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

Next

----------

७० हजारांचा कृषी औजार लंपास

अचलपूर : तालुक्यातील मौजे खेलतपमाडी शिवारातून ट्रॅक्टर फंटन, मोगडा, नांगर, बैलगाडीचे चाक, थ्रेशर मशीनची जाळी असा ७० हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. ही घटना २३ जुलै रोजी उघड झाली. मो.निसार मो. अहमद यांच्या तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------

बियरची बॉटल डोक्यावर फोडली

ब्राह्मणवाडा थडी : जुन्या वैमनस्यातून युवकाच्या डोक्यावर बियरची रिकामी बॉटल मारून जखमी केल्याची घटना घाटलाडकी येथे २४ जुलै रोजी घडली. सागर किशोर पटीले यांच्या तक्रारीवरून ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी आरोपी सुनील रुपराव पटीले (४०, रा. घाटलाडकी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------

मद्यपी मुलाने आईचे डोके फोडले

वरूड : दारूचे वेसन जडलेल्या मुलाने आईला शिवीगाळ करून जळत्या लाकडाने डोक्यावर मारून जखमी केले. ही घटना २३ जुलै रोजी डफरीन दवाखान्याजवळ वरूड येथे घडली. महिलेच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी संजय संतुस सलामे (३०) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------------

दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

मोर्शी : मागून भरधाव आलेल्या दुचाकीने धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाली. ही घटना स्थानिक तहसील कार्यालयाच्या गेटसमोर १६ जुलै रोजी घडली. प्रकाश लक्ष्मण निचत (३८, रा. चिंचोली गवळी) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध २४ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.

-------------------

६३०० रुपयांची सौर बॅटरी लंपास

शेंदूरजना घाट : धनोडी पर्यटन केंद्रातून ६३०० रुपयांची सौर बॅटरी अज्ञाताने लंपास केल्याची घटना २३ जुलै रोजी उघड झाली. सरुना रामजी दारसिम्बे यांच्या तक्रारीवरून शेंदूरजना घाट पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध २४ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.

---------------------

युवकाची ४० हजारांनी ऑनलाईन फसवणूक

शेंदूरजना घाट : फोन पे वर कॅश मिळविण्यासंदर्भात आलेल्या अनोळखी मोबाईल नंबरवरील मेसेजवर क्लिक केले असता, बँक खात्यातून ४० हजार उडविल्याची घटना मलकापूर येथे घडली. पंकज सुभाष राऊत (२९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------

शेताच्या धुऱ्यावरून दुचाकी लंपास

धामणगाव रेल्वे : शेताच्या धुऱ्यावरून ८ हजार रुपयांची दुचाकी लंपास केल्याची घटना जळगाव आर्वी शिवारात १९ जुलै रोजी घडली. हरगोविंद तेजमल लाहोटी यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध २४ जुलै रोजी गुन्हा नोंदविला.

--------------------

मोबाईलवर मेसेज केल्यावरून गुन्हा दाखल

धारणी : युवतीच्या मोबाईलवरून मेसेज पाठवून त्रास दिल्याची घटना तालुक्यात २१ जुलै रोजी उघड झाली. युवतीच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी रा. हसीलाल राजनेकर (१९, रा. बिबामल) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------

चारचाकी वाहनाची सायकलला धडक

आसेगाव पूर्णा : भरधाव चारचाकी वाहन एमएच ३१ ईयू १११८ च्या चालकाने सायकलस्वाराला धडक देऊन गंभीर जखमी केले. ही घटना तळणीपूर्णा फाट्यानजीक २४ जुलै रोजी घडली. तक्रारीवरून आसेगाव पूर्णा पोलिसांनी चारचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------

शेत विकल्यावरून वडिलाला काठीने मारहाण

माहुली जहागीर : शेत विकल्याच्या कारणावरून मद्यपी मुलाने ८० वर्षीय वडिलांना काठीने मारहाण केली. ही घटना २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता यावली शहीद येथे घडली. महिलेच्या तक्रारीवरून माहुली पोलिसांनी प्रदीप अण्णाजी लंगडे (३५, रा. यावली शहीद) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

अवैध रेती वाहणारा ट्रॅक्टर जप्त

अंजनगाव सुर्जी : पेट्रोलिंग दरम्यान तुरखेड फाट्यावर अवैध रेती वाहून नेणारा ट्रॅक्टर अंजनगाव पोलिसांनी २४ जुलै रोजी सायंकाळी ५.४० वाजता दरम्यान जप्त केला. याप्रकरणी आरोपी भास्कर देवराव हरदे (४५, रा. कारला) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: The minor girl was lured away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.