अल्पवयीन मुलीचे प्रियकरासोबत पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:10 AM2021-07-18T04:10:40+5:302021-07-18T04:10:40+5:30
अमरावती : इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या प्रियकारसोबत १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी पळून गेली. नंतर तातडीने गाडगेनगर ठाण्यात मुलीच्या आई-वडिलांनी धाव ...
अमरावती : इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या प्रियकारसोबत १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी पळून गेली. नंतर तातडीने गाडगेनगर ठाण्यात मुलीच्या आई-वडिलांनी धाव घेतल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी २४ तासाच्या मुलीला ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी उघडकीस आली. आई-वडिलांनी इन्स्टाग्रामवर मित्रासोबत बोलण्यास विरोध दर्शविल्यामुळे तिने पलायन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याप्रकरणी तिच्या १९ वर्षीय प्रियकारविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३६३ नुसार गुन्हा नोंदविला. शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरून निघून गेल्याची माहिती तिच्या आई- वडिलांनी गाडगेनगर ठाण्यात दिली. आई स्वंयपाक करीत असताना संधी साधून मुलीने इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्रासोबत पलायन केले. तिला इन्स्टाग्रामवर तीन मित्र होते. मात्र आई-वडिल तिला ऑनलाईन बोलू देत नव्हते. हा राग तिच्या मनात होता. त्यामुळे तिने पलायन केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले. पोेलिसांनी इन्स्टाग्रामवरून मित्रांची माहिती काढून ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात गाडगेनगरच्या महिला पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, पीएसआय राजेंद्र लेवटकर यांचे पथक मुलीच्या मित्राच्या घरी पोहचले. पण तेथे सदर मित्र त्यांना आढळून आले नाही. त्यानंतर ते स्वत: गाडगेनगर ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता, प्रियकाराने अल्पवयीन मुलीला तिच्या एक मैत्रिणीच्या घरी सोडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुलीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, इन्स्टाग्रामवर बोलण्यास आई-वडिलांनी नकार दिल्यानेच आपण पलायन केल्याचे तिने पोलिसांना सांगितल्याने पोलीसही अचंबित झाले.