वेतनश्रेणीऐवजी तुटपुंजी मानधनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:17 AM2021-06-16T04:17:41+5:302021-06-16T04:17:41+5:30

संताप : राज्यातील आठ हजार वसतिगृह कर्मचाऱ्यांवर शासनाचा अन्याय नरेंद्र जावरे परतवाडा (अमरावती) : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात ...

Minor salary increase instead of salary scale | वेतनश्रेणीऐवजी तुटपुंजी मानधनवाढ

वेतनश्रेणीऐवजी तुटपुंजी मानधनवाढ

Next

संताप : राज्यातील आठ हजार वसतिगृह कर्मचाऱ्यांवर शासनाचा अन्याय

नरेंद्र जावरे

परतवाडा (अमरावती) : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या राज्यभरातील अनुदानित वसतिगृहांतील अधीक्षक ते कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. अनेक वर्षांपासून वेतनश्रेणीची मागणी असताना, केवळ तुटपुंजे मानधन वाढवून शासनाने तोंडाला पाने पुसल्याने तीव्र निषेध व्यक्त करीत पुनर्विचार करून वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य शासनाने केलेल्या मानधनवाढीचा विरोध करीत, त्याऐवजी वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्य शासनाने वेतनश्रेणीचे आश्वासन देऊन खिरापत वाटल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण ६९, तर राज्यभरात एकूण २३८८ वसतिगृहे आहेत. त्यावर आठ हजारांवर अधीक्षक ते कर्मचारी आहेत. राज्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयी व मोठ्या गावांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही वसतिगृहे उघडण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा खेळ व भूलथापा बंद करून थेट वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी अनुदानित वसतिगृह संघटना (अमरावती) चे मुख्य सल्लागार डॉ. ज्ञानेश्वर राऊत, विदर्भ संघटक सागर तायडे, आनंद खातरकर, चंदू लोखंडे, सुभाष गावंडे, प्रमोद अभ्यंकर, सुभाष सोनारे आदींनी केली आहे

बॉक्स

मंत्र्यांच्या बैठकीत मुस्कटदाबीचा आरोप

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रालय व दालनात न्याय व विशेष साहाय्य विभाग मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक घेण्यात आली. राज्यातील अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीसंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मारुती कांबळे, सचिव अशोक ठाकर यांना व्हीसीद्वारे सहभागी करून घेण्यात आले. बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होत असताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्यात आली. वेतनश्रेणी लागू न करता, मानधनात वाढ करून तोंडाला पाने पुसल्याचा आरोप संघटनेच्या नेत्यांनी केला. आतापर्यंत अनेक आंदोलने केली, आता रस्त्यावर उतरणार असल्याचे संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आले.

कोट

राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात कर्मचाऱ्यांची उपासमार सुरू असताना, वेतनश्रेणी लागू न करणे ही खेदाची बाब आहे. शासनाने न्याय द्यावा, अशी संघटनांमार्फत आमची मागणी आहे.

डॉ. ज्ञानेश्वर राऊत, जिल्हा सल्लागार, परतवाडा

बॉक्स

अमरावती जिल्ह्यात ६९ वसतिगृहे

अमरावती १७

भातकुली, नांदगाव खंडेश्वर प्रत्येकी २

दर्यापूर ११

चांदूर बाजार, अचलपूर प्रत्येकी ४

तिवसा ५

धारणी, वरूड, धामणगाव रेल्वे प्रत्येकी ३

चांदूर रेल्वे १

चिखलदरा ९

अंजनगाव सुर्जी ५

अमरावती जिल्ह्यात एकूण वसतिगृह कर्मचारी संख्या - २३३, अधीक्षक - ६९, चौकीदार - ६९, स्वयंपाकी - ८१, मदतनीस - १४, विद्यार्थी संख्या - २९९९

बॉक्स

राज्यातील वसतिगृहे

वसतिगृहे ----- २३८८

विद्यार्थी ------ ९९५५२

मुलींची वसतिगृहे --- ५७८

मुलांची वसतिगृहे ---- १८१०

कर्मचारी एकूण --- ८१०४

अधीक्षक ----- २३८८

चौकीदार। ------ २३८८

मदतनीस ------- ४७०

स्वयंपाकी ------- २८५८

बॉक्स

मानधन वाढवून बोळवण

सध्याचे मानधन दिलेली वाढ एकूण अधीक्षक ९२०० ₹ ८०० ₹ १० हजार ₹ स्वयंपाकी ६९०० ₹ १६०० ₹ ८५०० ₹ चौकीदार ५७५० ₹ १७५० ₹ ७५०० ₹

मदतनीस. ५७५० ₹ १७५० ₹ ७५०० ₹

===Photopath===

150621\img-20210615-wa0025.jpg

===Caption===

अमरावती येथील समाज कल्याण वसतिगृह

Web Title: Minor salary increase instead of salary scale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.