‘लकी ड्रॉ’च्या नावावर गंडविले

By admin | Published: February 26, 2016 12:26 AM2016-02-26T00:26:34+5:302016-02-26T00:26:34+5:30

लकी ड्रॉमध्ये चार चाकी वाहनाचे बक्षीस लागल्याची बतावणी करून महिलेला १४ हजार ८०० रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघड झाला.

Missing in the name of Lucky Dra | ‘लकी ड्रॉ’च्या नावावर गंडविले

‘लकी ड्रॉ’च्या नावावर गंडविले

Next

अमरावती : लकी ड्रॉमध्ये चार चाकी वाहनाचे बक्षीस लागल्याची बतावणी करून महिलेला १४ हजार ८०० रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी ७५४९४२५२५७ क्रमांकाचा भ्रमणध्वनीधारक राजेशकुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या स्पर्धेच्या मानकरी ठरल्या असून आपल्याला चारचाकीचे पारितोषिक मिळाले आहे, अशी बतावणी करणारा भ्रमणध्वनी या महिलेला २४ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजताच्या सुमारास आला. त्याचवेळी राजेशकुमार नामक आरोपीने शाम चौकातील एसबीआय शाखेतील खाते क्रमांक देऊन ६५०० रुपये भरण्यास सांगितले. महिलेने २ हजार रुपये जमा केले. त्यानंतर १२ लाख ८० हजार रुपये मंजूर झाल्याचे महिलेला सांगून त्यासाठी १ टक्का अर्थात १२,८०० रूपये बँकेत जमा करण्याचा निरोप भ्रमणध्वनीवर संपर्क साधून देण्यात आला. त्यानुसार महिलेने बुधवारी दुपारी १२ हजार ८०० रुपये एसबीआय खात्यात जमा केले. त्यानंतर पुन्हा २५,६०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र, रक्कम न भरण्याची भूमिका या महिलेने घेतली. मात्र त्यांना आधी भरलेली रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)

Web Title: Missing in the name of Lucky Dra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.