रिलायंस ट्रेंड्सची पार्किंग व्यवस्था बेपत्ता

By admin | Published: November 4, 2016 12:44 AM2016-11-04T00:44:29+5:302016-11-04T00:44:29+5:30

अंबादेवी मार्गावरील रिलायंस ट्रेन्ड्सकडे पार्किंगची कुठेही व्यवस्था नसताना महापालिकेच्या बांधकाम

Missing the parking system of Reliance Trends | रिलायंस ट्रेंड्सची पार्किंग व्यवस्था बेपत्ता

रिलायंस ट्रेंड्सची पार्किंग व्यवस्था बेपत्ता

Next

महापालिकेचा वरदहस्त : सरकारी जागेवर बेकायदेशीर पार्किंग
अमरावती : अंबादेवी मार्गावरील रिलायंस ट्रेन्ड्सकडे पार्किंगची कुठेही व्यवस्था नसताना महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाने त्यावर मेहेरनजर राखली आहे. दरम्यान रेडिमेड कापडाच्या विक्रीतून अमरावतीकरांचा खिसा खाली करणाऱ्या रिलायंस ट्रेन्ड्सने पार्किंग व्यवस्थेवर मात्र मौन धारण के ले आहे.
येथील अंबादेवी मार्गावर रिलायंस ट्रेन्ड्स हे रेडिमेड कपडे विक्रीचे प्रतिष्ठान आहे. कुबडे ज्वेलर्सकडून ही जागा रिलायंस ट्रेन्ड्सने भाडेतत्त्वावर घेतली आहे. रिलायंस ट्रेन्ड्समध्ये रोज १ हजार ते १२०० ग्राहक भेटी देऊन कापड आणि अन्य खरेदी करतात. मात्र त्या ग्राहकांच्या दुचाकी वा चारचाकी वाहने पार्किंगसाठी रिलायंस ट्रेन्ड्सकडे कुठलीही व्यवस्था नाही. कुबडे ज्वेलर्स आणि हॉटेल रेलिश प्रतिष्ठानांसाठी तेथे पार्किंग व्यवस्था आहे. मात्र तेथील सुरक्षारक्षक रिलायंस ट्रेन्ड्समधील ग्राहकांना तेथे पार्किंग करण्यास मज्जाव करतो. त्यामुळे ग्राहकांना कुबडे ज्वेलर्सच्या बेकायदेशीर पार्किंगसमोर रस्त्यावर वाहने लावावी लागतात. कुबडे ज्वेलर्ससमोरील खुल्या जागेवर तेथील कर्मचारी आणि मालकवर्गांचीच वाहने लागतात. त्यामुळे रिलायंस ट्रेन्ड्समध्ये येणाऱ्या ग्राहकांची पार्किंगवरून हुज्जतबाजी होते अब्जावधी रुपये खर्च करून वेलफर्निश्ड मॉल उभारणाऱ्या रिलायंस ट्रेन्ड्सला ग्राहकांच्या वाहन व्यवस्थेशी कुठलेही सोयरसुतुक नाही. काही दिवसांपूर्वी कुबडे ज्वेलर्स समोर असलेल्या सरकारी जागेवर उभी करण्यात आलेली वाहने वाहतूक विभागाने उचलून नेली होती. ती सर्व वाहने रिलायंस ट्रेन्ड्मध्ये कापड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची होती. आम्ही आपल्या मॉलमध्ये आलोत, खरेदीही केली मग पार्किंगची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यावेळी ग्राहकांकडून उपस्थित करण्यात आला. मात्र त्यानंतरही लब्धप्रतिष्ठित रिलायंस ट्रेन्डने ग्राहकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी कुठलीही व्यवस्था केली नाही. आपल्याकडे अधिकृत अशी कुठलीही पार्किंग व्यवस्था नाही, असे रिलायंस ट्रेन्डकडून मुजोरपणे सांगितले जाते. अमरावतीकरांच्या खिशावर कोट्यवधींचा डल्ला मारणाऱ्या रिलायंस ट्रेन्ड्ला कुणाचीही भीती नाही आणि त्यामुळेच येणाऱ्या ग्राहकांशी अदबीने बोलण्याचे औदार्यसुद्धा रिलायंस ट्रेन्ड दाखवीत नाही.

Web Title: Missing the parking system of Reliance Trends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.