२४ नोव्हेंबरपर्यंत मिशन ‘टॅक्स रिकव्हरी ’

By Admin | Published: November 16, 2016 12:14 AM2016-11-16T00:14:19+5:302016-11-16T00:14:19+5:30

नगरविकास विभागाने ५०० आणि १ हजारांच्या चलनात कर स्वीकारण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याच्या ...

Mission 'Tax Recovery' till November 24 | २४ नोव्हेंबरपर्यंत मिशन ‘टॅक्स रिकव्हरी ’

२४ नोव्हेंबरपर्यंत मिशन ‘टॅक्स रिकव्हरी ’

googlenewsNext

८.२२ कोटींचा महसूल गोळा : २५ हजार मालमत्ताही लक्ष्य
अमरावती : नगरविकास विभागाने ५०० आणि १ हजारांच्या चलनात कर स्वीकारण्यास २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याच्या पार्श्वभूमिवर महापालिका करवसुलीसाठी सज्ज झाली आहे. अधिकाधिक महसूल गोळा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून ११ ते १४ नोव्हेंबरपर्यंत ८.२२ कोटी रूपये महसूल गोळा झाल्याची माहिती महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी दिली.
केंद्रशासनाच्या आदेशानुसार नगरविकास विभागाने रद्द झालेले ५०० आणि १ हजाराचे चलन स्वीकारण्यास मुदतवाढ दिल्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रपरिषदेला अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपायुक्तद्वय विनायक औगड व नरेंद्र वानखडे, मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड आदीसह एडीटीपी सुरेंद्र कांबळे, सहायक आयुक्त, एलबीटी अधीक्षकांची उपस्थिती होती.
मालमत्ताकर, स्थानिक संस्थाकर, बांधकाम परवानगी शुल्क आणि बाजार परवाना शुल्काच्या माध्यमातून महापालिका कर गोळा करते. या चार विभागांनी ११ नोव्हेंबरपासून ५०० आणि १ हजारांच्या जुन्या चलनाने कराची रक्कम स्वीकारली. शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस सुटी असताना कर्मचाऱ्यांनी ८.२२ कोटी रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले. यात धनादेशांचाही मोठा वाटा असल्याचे सांगून आयुक्तांनी अमरावतीकरांचे जाहीर आभार मानलेत. दरम्यान २४ नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या मुदतवाढीच्या अनुषंगाने सहायक आयुक्तांना सहकार्य करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ दिल्याचे ते म्हणाले. पाचही प्रशासकीय झोनमध्ये मंगळवारपासून करवसुली शिबिर घेतले जात आहे. याशिवाय थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे.

बड्यांकडून कर वसुली
अमरावती : मालमत्ताधारक, एलबीटीच्या अखत्यारित येणाऱ्या करधारकांसह बांधकाम परवानगी शुल्क आणि बाजार परवानाविभागातील थकबाकीदारांनी २४ नोव्हेंबरपर्यंत कर भरून पुढील प्रशासकीय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. महफिलसह सांस्कृतिक भवन आणि अन्य बड्यांकडूनही थकबाकी वसूल केल्याचे ते म्हणाले. महापलिकेने ११ नोव्हेंबरपासून करवसुलीसाठी एक चळवळ राबविली. त्यात पालिकेला उत्तम यश मिळाले. ११ ते १४ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये अन्य ‘ड’ वर्ग महापालिकांच्या तुलनेत अमरावती महापालिका अव्वल ठरली आहे. ज्यांनी रहिवासी मालमत्तेचा वाणिज्यिक वापर चालविला आहे, त्यांनी सुद्धा याविशेष मोहिमेमध्ये सहभागी होऊन सुधारित करभरणा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. महिन्याकाठी ११ कोटींचा खर्च आणि ७ कोटींची मिळकत असलेल्या महापलिकेला ८.२२ कोटी रूपयांची वसुली लाभदायी ठरणार असल्याचे ते म्हणाले.

११ नोव्हेंबरला सर्वाधिक करवसुली
११ नोव्हेंबरपासून ५०० आणि १ हजारांच्या जुन्या नोटांच्या माध्यमातून कराची रक्कम स्वीकारण्यात आली. यात ११ ला सर्वाधिक ३.६५ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. १२ तारखेला ८१ लाख, १३ तारखेला ७८ लाख आणि १४ नोव्हेंबरला २.९८ कोटी रुपये जमा झालेत. १५ नोव्हेंबरला सायंकाळी ६ पर्यंत ३९ लाख महसूल गोळा झाला.

२५ हजार मालमत्ता ‘अनअसेस ’
महापालिका क्षेत्रातील २५ हजार मालमत्तांमध्ये अनधिकृत बांधकाम आढळून आले होते. त्यांना सुरुवातीला सहा पट दंड ठोठावण्यात आला होता. आमसभेच्या मान्यतेने तो निर्णय बदलला असून अशा मालमत्ताधारकांनी स्वत: समोर येऊन नियमाप्रमाणे दोन पट दंड भरावा, २४ नोव्हेंबरपर्यंत त्यांनी स्वत: ‘अ‍ॅप्रोच’ व्हावे, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे. झोनस्तरावर त्यांनी कराचा भरणा करावा.

Web Title: Mission 'Tax Recovery' till November 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.