Bachchu Kadu : "माझ्या जीवाला धोका..."; आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 09:57 AM2024-06-21T09:57:03+5:302024-06-21T10:02:58+5:30
Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार कडू यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे.
Bachchu Kadu ( Marathi News ) : आमदार बच्चू कडू यांच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदार कडू यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत बच्चू कडू यांनी स्वत: जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. जीवाला धोका असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. या पत्रामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे.
NET-NEET मधील गैरप्रकारांवर काँग्रेसचा हल्लाबोल; देशभरात आंदोलन करणार
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात माझा अपघात झाल्याची अफवाही पसरवली जात असल्याचं म्हटलं आहे. "गोपनीय माहितीद्वारे माझ्या जीवाला धोका अलल्याचं कडू यांनी पक्षात म्हटले आहे. काही दिवसापासून बच्चू कडू यांच्या निकटवर्तीयांना अज्ञात व्यक्तीकडून फोन जात आहेत. या फोनमध्ये बच्चू कडू यांचा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांनी प्रकरणाचा शोध घ्यावा
"गेल्या काही दिवसापासून मी अमरावती जिल्ह्याच्या बाहेर गेलो की माझ्या जवळच्या व्यक्तीला फोन येतो आणि अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्यापाठिमागे कोण आहे माहित नाही, पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यावा. कार्यकर्त्यांनाही अज्ञात व्यक्तीकडून फोन येत आहे. काही लोक मुद्दाम करत असतील. आपण सावध राहूया, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.
पत्रात काय म्हटलंय?
आज आमदार बच्चू कडू यानी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आज सकाळी गोपनीय माहितीनुसार मला २ संदेश मिळाले आहेत. यामधून पहिल्या संदेशामध्ये दि.०४/०५/२०२४ रोजी रात्रीच्या सुमारास विदर्भ मिल स्टॉप अचलपूर परिसरातील भाजीपाला विक्रेत्याजवळ दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून एक माणूस आला, भाजीपाला विक्रेत्यासोबत बोलताना म्हणाला की, मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहत असून नक्षलवाद्यांशी माझे नजिकचे संबंध आहे. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेला संपविले तसेच शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही", "यानंतर त्याने खिशातून मोबाईल काढून मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्र्यांचे फोटो दाखवले. माझ्या डोक्यावर सर्वांचा हात असून मला कुणी काहीच करू शकत नाही. बच्चू कडूला पाहून घेऊ, असंही या पत्रात म्हटले आहे.