"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 16:38 IST2024-06-02T16:30:50+5:302024-06-02T16:38:46+5:30
Ravi Rana On Uddhav Thackeray : आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
Ravi Rana On Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी समोर येणार आहेत. या पार्श्वभमीवर काल एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. धक्कादायक निकाल लागणार असल्याचे अंदाज देण्यात आले आहेत. एनडीए देशात पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचे अंदाज देण्यात आले आहेत. दरम्यान, आता या एक्झिट पोलवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
"उद्धव ठाकरे निकालानंतर २० दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असा आमदार रवी राणा यांनी केला आहे. "एक्झिट पोलचे आकडे आज आले आहेत. ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याच दिवशी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे त्याच दिवशी आम्हाला निकाल माहित होता. म्हणून नवनीत राणा २ लाखांनी निवडून येणार हा आमचा दावा आहे, असंही रवी राणा म्हणाले.
"निवडणुकीच्या निकालानंतर वीस दिवसांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणार, मोदीजींनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी जी खिडकी उघडून ठेवली आहे त्या खिडकीतून उद्धव ठाकरे येतील. मोदीजींनी आधीच सांगितलं आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासाठी बाळासाहेब यांचे सुपूत्र म्हणून माझी नेहमी त्यांच्यासाठी एक खिडकी उघडी आहे. मी दाव्याने सांगतो, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर वीस दिवसातच उद्धव ठाकरे सरकारमध्ये दिसतील, कारण येणारा काळच देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदीजी आहेत हे उद्धव ठाकरे यांना माहित आहे, असा मोठा गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला.
'नवनीत राणा २ लाख मतांनी येणार'
आमदार रवी राणा यांनी यावेळी खासदार नवनीत राणा यांच्याबाबत मोठा दावा केला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून यावेळी नवनीत राणा यांनी लोकसभा लढवली. यावेळी तिरंगी लढत झाली. दरम्यान या मतदारसंघात निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार रवी राणा यांनी नवनीत राणा दोन लाख मताधिक्क्याने निवडून येतील असा दावा केला आहे.