आमदारांकडून जांभूळ विक्रेत्याची आस्थेने चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:10 AM2021-07-11T04:10:28+5:302021-07-11T04:10:28+5:30

मेळघाटचे जांभूळ आरोग्यासह, मोहात पाडणारी (फोटो कॅप्शन मोथा घाटवळणावर जांभूळ दिसताच चव चाखताना दर्यापूरचे आ बळवंत वानखडे जिल्हा ...

MLAs inquire into the purple seller | आमदारांकडून जांभूळ विक्रेत्याची आस्थेने चौकशी

आमदारांकडून जांभूळ विक्रेत्याची आस्थेने चौकशी

Next

मेळघाटचे जांभूळ आरोग्यासह, मोहात पाडणारी

(फोटो कॅप्शन मोथा घाटवळणावर जांभूळ दिसताच चव चाखताना दर्यापूरचे आ बळवंत वानखडे जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दर्यापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव संजय बेलोकार, अभिजित देवके, बाजार समितीचे संचालक साहेबराव भदे, अमोल देशमुख)

नरेंद्र जावरे-चिखलदरा : रोजच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यस्ततेमुळे राजकीय क्षेत्रातही सर्वांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मेळघाटच्या घाटवळणातून जाताना, रस्त्याच्या कडेला जांभूळ विक्रेता आदिवासी युवकाकडे त्यांची नजर पडली आणि गाड्यांचा ताफा अचानक थांबला. वाहनातून उतरलेल्या व्यक्तींना पाहून पर्यटकही थोडा वेळ थबकले. त्यांनी जांभूळ घेतली आणि मोठ्या चवीने त्याचा आस्वाद घेत काही क्षण का होईना जीवनातील एका अमूल्य आनंदाचा क्षण अनुभवला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता चिखलदरा मार्गावरील मोथा वळणावर अनेकांनी हा प्रसंग टिपला.

सहकार क्षेत्रातील निवडणुकीची धामधूम जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू आहे. काही वेळासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक चिखलदरा पर्यटन स्थळावर अगदी मोजक्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आली होती. आ. बळवंत वानखडे, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, संजय बेलोकार, अभिजित देवके, साहेबराव भदे, अमोल देशमुख व सहकारी या बैठकीला जात होते. अचानक आमदार बळवंत वानखडे यांना रस्त्याच्या कडेला जांभूळ विक्रेता दिसला. गाड्यांचा ताफा थांबला. काही वेळ जांभूळ खाऊन झाल्यावर पुन्हा ते आपल्या नियोजित बैठकीला निघून गेले.

बॉक्स

जांभूळ विक्रेत्यांची आस्थेने चौकशी

जांभूळ विकत घेऊन खाल्ल्यावर निघून जातात. मात्र, आमदार बळवंत वानखडे व सहकाऱ्यांनी जांभूळ विक्रेत्याची आस्थेने सर्व चौकशी केली. त्याला दररोज किती रोज मिळतो किती दिवस कमावू शकतो, अशी विचारणा केली. राजकारणातून खरे समाजकारणाचे दर्शनाचा हा संवाद पर्यटकही टिपत होते. नेत्यांचे वाहन पुढे निघाल्यावर पर्यटकांच्या आपसातील चर्चा कौतुकाची थाप देणाऱ्या ठरल्या.

Web Title: MLAs inquire into the purple seller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.