आमदार - खासदारांचा सोशल मीडियावरच गोपालकाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:47+5:302021-09-02T04:27:47+5:30

असाईनमेंट पान १ किंवा पान ४ अमरावती : सध्या श्रावण महिना सुरू असला तरी मंदिरे बंद आहेत. त्यामुळे आमदार-खासदार ...

MLAs - MPs to Gopalkala only on social media! | आमदार - खासदारांचा सोशल मीडियावरच गोपालकाला !

आमदार - खासदारांचा सोशल मीडियावरच गोपालकाला !

Next

असाईनमेंट

पान १ किंवा पान ४

अमरावती : सध्या श्रावण महिना सुरू असला तरी मंदिरे बंद आहेत. त्यामुळे आमदार-खासदार यांनी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. खासदारही त्यात मागे नाहीत. श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून रक्षाबंधनापर्यंत विविध सणांच्या शुभेच्छा खासदार आमदारांच्या छायाचित्रांसह फेसबुक, व्हॉट्सॲप, टि्वटर, इंस्टाग्रामवर झळकत आहेत. एकंदरितच काय, तर आमदार खासदारांच्या शुभेच्छांचा सोशल मीडियावरच गोपालकाला झाला आहे.

////////////

यशोमती ठाकूर

नंद किशोरा, चित्त चकोरा, गोकुळ कान्हा मनमोहना तू, अशा ओळी लिहत पालकमंत्री तथा तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी जनताजनार्दनाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेचछा दिल्या आहेत. प्रत्येक सणाच्या शुभेच्छा त्या सोशल मीडियावरून देतात.

//////////

सुलभा खोेडके

अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके सोशल मिडियाचा वापर खुबीने वापर करतात. दहिहंडी व गोपाळकाल्याच्या शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांच्या फेसबुकवर वॉलवर दिसून येते. अनेकांनी त्या पोस्टला लाईक्स दिले आहेत.

///////////////

रवी राणा

बडनेराचे आमदार रवि राणा सोशल मिडियावर सक्रिय आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे टेक्नोसेव्ही कार्यकतञयांची फौज आहे. त्यांनी देखील खासदार पत्नीच्या छायाचित्रांसह नागरिकांंना सोशल प्लॅटफाॅर्महन शुभेच्छा दिल्या आहेत.

/////////////

बच्चू कडू

अकोल्याचे पालकमंत्री तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या सोशल मिडियावर तगडा फॅन फॉलोविंग आहे. ते देखील फेसबुक, ट्विटरवर व्यक्त होत असतात. गोकुळाष्टमीसह रक्षाबंधनाच्या शुभेच्छादेखील त्यांच्या एफबी वाॅलवर झळकल्या आहेत.

///////////

देवेंद्र भुयार

दहिहंडीरूपी ध्येय साध्य करणारा सण म्हणजे गोपाळकाला. अशा शब्दात मोर्शीचे आमदार देवेंद्र भूयार यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रक्षाबंधनासह प्रत्येक सणाच्या शुभेच्छा ते प्रत्यक्ष भेटण्यासह समाजमाध्यमांवर देत असतात.

///////////

बळवंत वानखडे

दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे हेदेखील सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात. श्रावणातल्या नव्हे तर स्वातंत्र्यदिनापासून प्रजासत्ताकदिनापर्यंत आणि दसरा दिवाळीपर्यंत शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट त्यांच्याकडून झळकतात.

///////////

राजकुमार पटेल

राधाची भक्ती, बासुरीची गोडी, लोणीचा स्वाद आणि गोपींचा रास, सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास’ अशा शब्दात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी नागरिकांंना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा फेसबुकवरून दिल्या आहेत.

///////

प्रताप अडसड

धामणगावचे आमदारदेखील समाजमाध्यमांवर वेळोवेळी व्यक्त होत असतात. त्यांच्या फेसबुक वॉलवर विविध सणांच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट पहावयास मिळतात. सुंदर शब्दांचा चपखल वापर पोस्टसाठी करण्यात येतो.

/////////////

खासदारही ट्विटरवर ॲक्टिव्ह

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या फेसबुकसह टि्वटरवर देखील चांगल्याच सक्रीय आहेत. रक्षाबंधनापासून अलीकडच्या जन्माष्टमी व गोगानवमीच्या शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांनी टि्वटरवर अपलोड केली आहे. त्या सर्वच समाजमाध्यमांवर ॲक्टिव्ह आहेत.

Web Title: MLAs - MPs to Gopalkala only on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.