बडनेरा रेल्वे वॅगन कारखान्यातील समस्यांकरिता मनसेचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:00+5:302021-05-28T04:11:00+5:30
बडनेरा : रेल्वे वॅगन कारखान्यात व्यवस्थापकांच्या मुजोरीपणामुळे कामगारांवर अन्याय होत असल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेे शहर अध्यक्ष गौरव ...
बडनेरा : रेल्वे वॅगन कारखान्यात व्यवस्थापकांच्या मुजोरीपणामुळे कामगारांवर अन्याय होत असल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेे शहर अध्यक्ष गौरव बांते यांच्याकडे सातत्याने आल्या असून, पगारांच्या बाबतीत स्थानिक कामगारांसोबत नेहमी दुजाभाव केला जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
कोरोना परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही नियोजन वा उपाययोजना त्याठिकाणी दिसून येत नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा न करू शकणाऱ्या या कंपनी व्यवस्थापनाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. व्यवस्थापक सुजय भट्टाचार्य आणि इतर सहकाऱ्यांना स्वतः कंपनी परिसरात फिरवून सर्व पितळ उघडे पाडण्याचा आक्रमक प्रकार संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, व्यवस्थापनेतील लोकांनी कामगारांसोबत आपली वर्तवणूक सुधरविण्याचा सज्जड दम पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. लवकरात लवकर कामगारांच्या समस्यांचे निराकरण करावे, अन्यथा मनसेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, शहर अध्यक्ष गौरव बांते, शहर उपाध्यक्ष नितेश शर्मा, विवेक पवार, शहर सचिव राजेंद्र देवडा, प्रभाग अध्यक्ष हरीश तुमरे, ऋषी मिलखे, कमलेश कडव, अक्षय बारापत्रे, नागेश कडवं, अमोल किंदरले, अक्षय पोकळे, अभिषेक लोखंडे, अमोल दुधे, राजेश ढोरे, किशोर भोयर, धर्मेंद्र कारांगोरे आदींची उपस्थिती होती.