विदर्भ राज्याचे आंदोलन मनसेने उधळले

By Admin | Published: May 2, 2017 12:42 AM2017-05-02T00:42:36+5:302017-05-02T00:42:36+5:30

विदर्भ राज्यासाठी पुकारलेले आंदोलन शांततेत सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे आंदोलन उधळून लावले.

MNS ridiculed Vidarbha state's agitation | विदर्भ राज्याचे आंदोलन मनसेने उधळले

विदर्भ राज्याचे आंदोलन मनसेने उधळले

googlenewsNext

खुर्च्यांची फेकाफेक : राजकमल चौकातील घटना
अमरावती : विदर्भ राज्यासाठी पुकारलेले आंदोलन शांततेत सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे आंदोलन उधळून लावले. राजकमल चौकातील वनिता समाजसमोर आंदोलनस्थळी खुर्च्यांची फेकफाक करून बॅनर काढण्यात आल्याने खळबळ उडाली होती.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त सकाळी शाम नगरातील विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राजेंद्र माधव आगरकर (६१) यांच्या नेत्तृत्वात अन्य कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी वनीता समाजसमोर आंदोलन सुरु केले. १२.३० वाजताच्या सुमारास मनसेचे संतोष बद्रे, बच्चु रेडे, प्रविण डांगे, संजय गव्हाळे व धिरज तायडे व अन्य कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन विदर्भ वेगळा होऊ देणार नसल्याच्या घोषणा सुरु केल्या आणि आंदोलनस्थळावरील खुर्च्यांची फेकफाक सुरु करून त्यांचे बॅनर काढून फेकले. या घटनेची माहिती मिळताच कोतवालीच्या ठाणेदार निलीमा आरज पोलीस ताफ्यासह आंदोलनस्थळी पोहोचल्या. त्तपूर्वी मनसेचे पदाधिकारी तेथून निघून गेले होते. (प्रतिनिधी)

Web Title: MNS ridiculed Vidarbha state's agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.