महावितरण कार्यालयावर मनसेची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:13 AM2021-03-19T04:13:34+5:302021-03-19T04:13:34+5:30
अमरावती : कोरोना काळातही महावितरणने विद्युत देयके वसुलीकरिता धडक मोहीम राबविली. अनेकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. कोरोनाकाळात कुणाचेही ...
अमरावती : कोरोना काळातही महावितरणने विद्युत देयके वसुलीकरिता धडक मोहीम राबविली. अनेकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. कोरोनाकाळात कुणाचेही वीज कनेक्शन तोडू नये, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकत्यांनी महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यलयासमोर आंदोलन छेडले. येथे आधीच उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. सदर आंदोलन गुरुवारी दुपारी करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना असतानाही गरीब वीजग्राहकांना ७० टक्के विद्युत बिले भरण्याकरिता सक्ती केली जात आहे. या संदर्भात मनसेकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. सदर आंदोलन महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, गौरव बांते, प्रवीण डांगे, रिना जुनगरे, वृंदा मुक्तेवार, निखिल बिजवे यांच्यासह कार्यकत्यांची उपस्थिती होती.