पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात मनसेची तोडफोड

By admin | Published: July 3, 2014 11:20 PM2014-07-03T23:20:08+5:302014-07-03T23:20:08+5:30

मागील काही महिन्यांपासून शासकीय स्वस्त धान्य दुकानात धान्य पुरवठा झाला नसल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. याचा गुरूवारी जाब विचारण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या

MNS violation in the supply chain | पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात मनसेची तोडफोड

पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात मनसेची तोडफोड

Next

अांदोलनाचा भडका : रेशन धान्य पुरवठ्याची मागणी
अमरावती : मागील काही महिन्यांपासून शासकीय स्वस्त धान्य दुकानात धान्य पुरवठा झाला नसल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. याचा गुरूवारी जाब विचारण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संप्तत कार्यकर्त्यांनी अधिकारी हजर नसल्याने शहर अन्न धान्य वितरण अधिकारी यांच्या दालनातील टेबलवरील काचा फोडून या अधिकाऱ्याची खुर्ची कक्षाबाहेर फेकली. या घटनेमुळे पुरवठा विभागात खळबळ उडाली होती.
गेल्या चार महिन्यापासून द्रारिद्ररेषेवरील लाभार्थ्याना आणि द्रारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना धान्य पुरवठा झाला नसल्याने शहरासह जिल्ह्यातील हजारो लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत. गोरगरीब मजुरांच्या हाताला पाऊस नसल्यामुळे काम नाही, अशा परिस्थितीत दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई यामुळे द्रारिद्र्यरेषेवरील आणि द्रारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्याना धान्य विकत घेणे कठीण झाले असताना शासनाने धान्य पुरवठा केला नाही अन्न सुरक्षा योजना सुरू केली. मात्र या योजनेच्या सुरूवातीपासूनच धान्य पुरवठ्याची कमी आहे. शासनाच्या वेळकाढु धोरणामुळे धान्य पुरवठा होत नसल्याचा आरोप केला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे यांना जाब विचारण्यासाठी त्याचे कार्यालय गाठले. मात्र ते हजर नसल्यामुळे मनसे कार्यकर्त्यानी आपला मोर्चा शहर अन्न धान्य अधिकारी प्रकाश देशपांडे यांच्या कक्षाकडे वळविला मात्र तेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले होते अधिकारीच कार्यालयात नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संप्तत कार्यकर्त्यानी अन्य धान्य वितरण अधिकारी यांच्या दालनातील टेबलवरील काचा फोडुन अधिकाऱ्याची खुर्ची कक्षाबाहेर फेकली. हा प्रकार घडल्यानंतर देशपांडे कार्यायात आले . दरम्यान मनसे कार्यकर्त्यानी आठ दिवसात एपीएल आणी बिपीएल राशन कार्डधाकांना त्वरीत धान्य पुरवठा करावा अशी तंबी देऊन पुरवठा कार्यालयातून निघून गेले. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण तायडे, शहर अध्यक्ष संतोष बद्रे, तुषार तायडे, राम काळमेघ, शुभम वानखडे, धीरज तायडे, सूरज बरडे, सागर कनोलकर, हिमांशु मिशने, नीलेश कदम आदींचा सहभाग होता.

Web Title: MNS violation in the supply chain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.