स्काय वॉककरिता मनसेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:10 AM2021-07-19T04:10:11+5:302021-07-19T04:10:11+5:30
राज ठाकरेंना घालणार गळ : मेळघाटातील स्थानिकांना नवसंजीवनी देणारा प्रकल्प परतवाडा : चिखलदरा येथील थांबलेले स्काय वॉकचे काम पूर्णत्वास ...
राज ठाकरेंना घालणार गळ : मेळघाटातील स्थानिकांना नवसंजीवनी देणारा प्रकल्प
परतवाडा : चिखलदरा येथील थांबलेले स्काय वॉकचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता आणि केंद्रीय वनविभागाकडून होत असलेली अडवणूक थांबविण्याकरिता मनसेचे प्रीतेश अवघड यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठविले आहे. त्यांनी हे निवेदन उपविभागीय अधिकारी धारणी यांच्यामार्फत पाठविले आहे.
स्काय वॉकमुळे चिखलदऱ्यासह मेळघाटचे नाव जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होणार आहे. मेळघाटातील स्थानिकांना नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प असून, त्याचे थांबलेले काम त्वरित सुरू करावे, याकरिता केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी मनसेचे प्रीतेश अवघड यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. केंद्रीय वनविभागानेही यात सहकार्याची भूमिका स्वीकारावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
२०१८ मध्ये राज ठाकरे चिखलदऱ्याला दोन दिवस मुक्कामी होते. त्यांना या स्काय वॉक प्रकल्पाची माहिती देण्यात आली होती. त्यादरम्यान त्यांनी या प्रस्तावित प्रकल्पाची प्रशंसा केली होती. पण, केंद्र व राज्य सरकारच्या श्रेय वादाच्या लढाईत सदर प्रकल्पाचे काम थांबले आहे. त्यामुळे हा विषय राज ठाकरेंपर्यंत पोहचविणार असल्याचे प्रीतेश उघड यांनी म्हटले आहे.