शाळकरी मुलांच्या हातातून सुटला मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:44+5:302021-02-10T04:13:44+5:30
मोबाईलचा फोटो टाकणे पान ३ कावली वसाड : काही दिवसांपासून पाचवी ती आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या हातून ...
मोबाईलचा फोटो टाकणे
पान ३
कावली वसाड : काही दिवसांपासून पाचवी ती आठवीचे वर्ग शाळांमध्ये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या हातून मोबाईल सुटल्याचे दिसून येत आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे मार्च २०२० पासून शाळा-महाविद्यालये बंद होती. ते शैक्षणिक नकसान भरून काढण्यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. अॅन्ड्राॅईड मोबाईल व इंटरनेट बॅलेन्स गरजेचे होऊन बसले. रोज सुमारे दोन ते चार तास मोबाईल डोळ्यांसमोर राहू लागला. आता मात्र शाळा सुरू झाल्याने पालकांना हायसे वाटू लागले आहे.
ऑनलाईन शिक्षण प्रणाली आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांना अडचणीच्या काळात मोबाईल खरेदी करण्यास भाग पडले. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांसाठी मोबाईल खरेदी केली होती. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा मोबाईलमध्ये गुंतून राहत होता. अलीकडे शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांपासून मोबाईल दूर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना चांगल्या कंपनीचा मोबाईल घेऊन दिला तसेच प्रत्येक महिन्याचा रिचार्जसुद्धा आई-वडीलच करून देत होते. त्यामुळे विद्यार्थी शाळेच्या अभ्यासासोबतच मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न राहत होता. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा मोबाईल सुटल्याची सुखद प्रतिक्रिया पालकांनी दिली.