मोबाईलचा तगादा जिवावर बेतला, पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:17 AM2021-08-13T04:17:31+5:302021-08-13T04:17:31+5:30

अमरावती : मोबाईलचा तगादा नवविवाहित पत्नीच्या जिवावर बेतल्याची घटना गोपालनगरनजीक आदर्शनगरात गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. पूजा ...

Mobile phone rammed his life, strangled his wife to death | मोबाईलचा तगादा जिवावर बेतला, पत्नीचा गळा आवळून खून

मोबाईलचा तगादा जिवावर बेतला, पत्नीचा गळा आवळून खून

googlenewsNext

अमरावती : मोबाईलचा तगादा नवविवाहित पत्नीच्या जिवावर बेतल्याची घटना गोपालनगरनजीक आदर्शनगरात गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. पूजा विजय राठोड (२३) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी पती विजय दादाराव राठोड (२८) याने राजापेठ पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. प्रथमदर्शनी ही हत्या काैटुंबिक कलह व मोबाईलच्या वादातून घडल्याची सांगितले जात आहे. राजापेठ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बडनेरा रोडवरील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षक असलेल्या विजय राठोडचे ११ महिन्यांपूर्वी आर्वी येथील पूजाशी लग्न झाले. लग्नानंतर राठोड दाम्पत्य आदर्शनगरमध्ये भाड्याची खोली करून राहू लागले. तीन चार दिवसांपूर्वी पूजाचा मोबाईल फुटला. तेव्हापासून तिने पतीकडे नव्या मोबाईलसाठी तगादा लावला.

दरम्यान, गुरुवारी या दाम्पत्याने २२ हजार रुपये किमतीचा मोबाईल पसंतदेखील केला. मात्र, तेवढी रक्कम नसल्याने ते दोघेही घरी परतले. घरी आल्यानंतर दोघांमध्ये त्याच कारणावरून वाद झाला. वादादरम्यान आरोपी विजयने पत्नी पूजाच्या नाकावर जोराने प्रहार केला तसेच तथा तिचा गळा देखील आवळला. त्यात तिचा घटनास्थळीच मूत्यू झाला. शुल्लक कारणामुळे पत्नीचा खून केल्याचे लक्षात येताच विजयने रडत-रडत राजापेठ पोलीस ठाणे गाठले. खुनाचा कबुलीजबाब दिला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मोबाईलचा तगादा लावल्याने व तो घेण्याची आर्थिक कुवत नसल्याने वाद झाला. त्यातून ही घटना घडलयाची कबुली आरोपीने दिल्याची माहिती राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Mobile phone rammed his life, strangled his wife to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.