अचलपुरात मोबाईल दुकानदाराने दिला मानवतेच्या परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:23+5:302021-07-17T04:11:23+5:30
अचलपुरात मोबाईल दुकानदाराने दुकानात सापडलेले महिलेचा पैसा चा बटवा त्या महिलेचा शोध घेऊन त्यात परत केल्याची घटना अचलपूर घडली ...
अचलपुरात मोबाईल दुकानदाराने दुकानात सापडलेले महिलेचा पैसा चा बटवा त्या महिलेचा शोध घेऊन त्यात परत केल्याची घटना अचलपूर घडली . दुकानदाराच्या ह्या मानवतेच्या परिचयाचे अचलपुरात सर्वजण कौतुक करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील देवडी परिसरात मंगलमूर्ती मोबाईल शॉपी असून सदर दुकान नात दिनांक 12 जुलै रोजी दुकानाचे मालक गजानन लखपती त्यांना एक बटवा मिळाला याबद्दल यामध्ये आठ हजार 940 रुपये रोख रक्कम होती त्यांनी आजूबाजूला या बटवा बाबत विचारणा केली मात्र त्यांना यश आले नाही दुकानदाराने दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला असता एक वृद्ध महिलेचा तो बटवा असल्याचे निदर्शनात आले. सदर वृद्ध महिला मोबाईल रिचार्ज आणि मोबाईल चार्जर घेण्यासाठी दुकानात आली असता तेव्हा ते पडल्याचे दिसून आले. सीसीटीव्ही कॅमेरा वाढून त्या वृद्ध महिलेचा मोबाइल दुकानदाराने शोध घेतला. ते वृद्ध महिला भी लोना येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. लखपती यांनी अचलपूर पोलीस स्टेशन गाठून ठाणेदार सेवानंद वानखडे यांना हकीकत सांगितली व पैशाचा बटवा ठाण्यात जमा केला अचलपुर पोलिसांनी त्या वृद्ध महिलेला भिलोना येथून शोधून पोलीस स्टेशनमध्ये आणले व त्या महिलेला त्याचे 8 हजार 940 रुपयाचे बटवा परत केला. सदर बटवा भिलोना येथील वृद्ध महिला राजकन्या दिगंबर शिंगणे यांचा होता. त्यांना तो अचलपुर पोलीस ठाण्यात परत करण्यात आला.
160721\img-20210715-wa0148.jpg
अचलपूर मोबाईल दुकानदारांनी दिला मानवतेचा परिचय