दिव्यांगांकरिता मोबाईल टीचर्स योजना
By admin | Published: June 21, 2017 12:12 AM2017-06-21T00:12:21+5:302017-06-21T00:12:21+5:30
शासनाच्या प्राधान्य क्रमांकवर अपंग बांधवांचा विचार केल्या जातो. अपंग जीवन विकास संस्थेने अपंगांकरिता चालविलेली चळवळ उत्कृष्ट आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : ७७ अपंगांना उपयुक्त साहित्याचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाच्या प्राधान्य क्रमांकवर अपंग बांधवांचा विचार केल्या जातो. अपंग जीवन विकास संस्थेने अपंगांकरिता चालविलेली चळवळ उत्कृष्ट आहे. त्यांच्या योजनांची अंमलबाजवणी हे माझे पहीले प्राधान्य राहील. याकरिता लवकरच अपंग बांधवाना घरपोच सेवा देण्याकरिता मोबाईल टिचर्स उपक्रम राबवू अशी ग्वाही जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. जीवन विकास पुनवर्सन संस्थेच्या अपंग साहित्य वाटप सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते़
दरवर्षीप्रमाणे यंदाही ७७ अपंगांना तीन चाकी सायकली, श्रवनयंत्र, अंध काठी आधी साहीत्याचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून माजी आमदार रावसाहेब शेखावत, पुष्पा बोंडे, सुभाष गवाई, प्रल्हाद ठाकरे, विजय बोंडे,वसंतराव साऊरकर, गोविंद कासट,संजय मापले आणि आयोजन किशोर बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या अनेक वषार्पासुन अपंगाना दिलासा देवुन त्यांना अपगत्वावर मात करण्याची शक्ती या संस्थेमार्फत दिली जात असल्याचे किशोर बोरकर यांनी सांगितले.