रेल्वेत गाड्यांमध्ये मोबाईल चोरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:36 PM2018-10-11T21:36:35+5:302018-10-11T21:37:03+5:30

रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाइल मोठ्या शिताफीने चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेत गाड्यांमध्ये अल्पवयीन मुलांच्या मुक्त संचाराकडे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने दुर्लक्ष चालविले आहे.

Mobile thieves halved in railway trains | रेल्वेत गाड्यांमध्ये मोबाईल चोरांचा हैदोस

रेल्वेत गाड्यांमध्ये मोबाईल चोरांचा हैदोस

Next
ठळक मुद्देबालकांची टोळी सक्रिय : रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी अनभिज्ञ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाइल मोठ्या शिताफीने चोरणारी अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेत गाड्यांमध्ये अल्पवयीन मुलांच्या मुक्त संचाराकडे रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने दुर्लक्ष चालविले आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये हल्ली रेल्वे प्रवास असुरक्षित झाला आहे. रेल्वे पोलीस नेमके कोणते कर्तव्य बजावतात, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. रेल्वेची मालमत्ता, प्रवासी सुरक्षिततेसाठी प्रशासनाने बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. मात्र, चेन स्नेचिंग, साहित्याची चोरी, मोबाइल चोरी, उचलेगिरीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. एवढेच नव्हे, तर अहमदाबाद- चेन्नई नवजीवन एक्स्प्रेसने गांजा तस्करी होत असल्याचे सर्वश्रुत असूनही रेल्वे पोलीस ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा कारभार करीत आहेत.
गांजा कोण, कोठून, कसा आणतो, याची इत्थंभूत माहिती रेल्वे पोलिसांना असताना ठोस कारवाई का नाही, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. बडनेरासह अकोला, वर्धा, पुलगाव येथील नवख्या चोरट्यांनी धावत्या रेल्वे गाड्यांना लक्ष्य केले आहे. यात काही बालकांचाही समावेश असल्याची माहिती आहे. प्रवाशांकडील मोबाइल क्षणात लंपास करणारी अकोला, बडनेरा येथील अल्पवयीन मुलांची टोळी सक्रिय झाली आहे.
खाद्यपदार्थ विक्रीच्या नावाखाली अल्पवयीन मुलांचा धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये मुक्त वावर असतो. प्रवाशांकडील महागडे मोबाइल क्षणात उडविण्याची किमया करणाऱ्या या नवख्या टोळीकडे पोलिसांचे अद्याप दुर्लक्ष आहे. १२ ते २० वर्षे वयोगटातील युवक-बालकांचाही या टोळीत समावेश आहे. प्रवाशांकडील सामान, साहित्य चोरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. मोबाइल चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत असताना रेल्वे पोलिसांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
मोबाईल चोरीच्या घटनांची तक्रार नोंदविण्यास नकार
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोबाईलचोरांनी लक्ष्य केले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झाल्याची घटना घडते, त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्याद नोंदविणे कठीण होते. बरेचदा मोबाइल चोरीची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांकडून नकारघंटा दर्शविली जाते. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये नियमित वाढ होत असल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी भुसावळ येथील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्याच्याकडून मोबाइल मिळाला नाही. नियमित गस्त सुरू आहे. लवकरच टोळी जेरबंद केली जाईल.
- एस.डी. वानखडे
पोलीस निरीक्षक, बडनेरा रेल्वे

Web Title: Mobile thieves halved in railway trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.