विनापरवानगी उभारले मोबाईल टॉवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:32+5:302021-01-22T04:12:32+5:30
आरोग्याशी खेळ : तहसीलदारांकडे तक्रार तळेगाव दशासर : येथील प्रभाग क्र. ६ मधील शिवाजी चौकाजवळील एका घराच्या छतावर मिनी ...
आरोग्याशी खेळ : तहसीलदारांकडे तक्रार
तळेगाव दशासर : येथील प्रभाग क्र. ६ मधील शिवाजी चौकाजवळील एका घराच्या छतावर मिनी मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या विशिष्ट कंपनीच्या टॉवर उभारणीदरम्यान ग्रामपंचायत कार्यलयाला कुठलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. परिसरातील नागरिकांची संमती न घेता सदर टॉवरची उभारणी करण्यात आली आहे.
हे टॉवर रहिवासी क्षेत्रात येत असून, सदर टॉवरच्या घातक किरणांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळ किंवा नैसर्गिक आपत्तीत टॉवर कोसळल्यास जीवितहानी होऊ शकते. अशा स्वरुपाची ओरड परिसरातील नागरिकांमधून होत आहे. या संबंधी परिसरातील नागरिकांनी तहसीलदार, ग्राम विकास अधिकारी, पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. संबंधित अधिकाऱ्यानी याप्रकरणी लक्ष देऊन टॉवर उभारणी थांबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे.
--------------