‘मॉडर्न गर्ल’च्या नादात ‘तो’ झाला नादार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:11 PM2018-05-26T23:11:31+5:302018-05-26T23:11:58+5:30

'Modern Girl' was in 'Nada' | ‘मॉडर्न गर्ल’च्या नादात ‘तो’ झाला नादार

‘मॉडर्न गर्ल’च्या नादात ‘तो’ झाला नादार

Next
ठळक मुद्देनंदूरबारच्या तरुणीची करामतफे्रजरपुरा पोलिसात फसवणुकीची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मॉडेलसारख्या राहणाऱ्या एका तरुणीने विवाहित तरुणाला प्रेमजाळ्यात अडकवून लाखो रुपयांनी फसविल्याची तक्रार शनिवारी फे्रजरपुरा पोलिसात नोंदविली गेली. पहिल्यांदाच अशाप्रकारची आगळी तक्रार पोलिसात दाखल झाल्याने कुतूहलाचा विषय बनला होता. नंदूरबार येथील त्या तरुणीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रशांतनगर परिसरातील रहिवासी सागर गाडे (३०) डीजे साऊंड सिस्टीमचा व्यवसाय करीत होता. विवाहानंतर त्याला दोन मुली झाल्या आणि पती-पत्नीत खटके उडू लागले. दरम्यान सागरच्या मुंबई येथील मावस भावाने मॉडर्न व स्टॅन्डर्ड राहणीमान असलेल्या एका मुलीला घरी आणले. मुंबईत फार्मचे प्रशिक्षण घेताना त्या तरुणीची सागरच्या मावसभावासोबत ओळख झाली. त्याने तिला सागरच्या घरी आणले. सागरचा स्वभाव, कामकाज व पती-पत्नीचे वाद पाहून त्या तरुणीने सागरला आधार दिला. स्टॅडर्ड मेन्टेन करणाºया त्या तरुणीने सुंदर कपडे परिधान करून सागरला मोहित करण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नीच्या वादाचा गैरफायदा घेऊन सागरशी जवळीक साधली. सागर पत्नीला सोडणार असल्याचे त्या तरुणीला कळले. त्यामुळे आता दोघेही एकमेकांसोबत प्रेमीयुगुलांसारखे राहू लागले. दोघेही हॉटेलिंग करायचे, वॉटर लॅन्डमध्ये मौजमस्ती करायला गेले. गार्डनमध्ये फिरून प्रेममिलाप करायला लागले.
सर्वस्व लावले पणाला
दोघांमध्ये लैंगिक संबंध प्रस्थापित झाले. तिच्यावर वारेमाप खर्चसुद्धा करू लागला. त्या तरुणीने सागरला मेडिकल टाकण्याचा सल्ला दिला. त्याने डीजेचे साहित्य विकून आठ लाख मिळविले. ते पैसे त्या तरुणीनेच ठेवून घेतले. सागरने तिला लॅपटॉप, दोन मोबाईलसुद्धा घेऊन दिले. त्यासाठी त्याने त्याची चारचाकी व दुचाकीसुद्धा विकली. सागर ती म्हणेल, तेच करू लागला. तिने सागरला न सोडण्याबाबत स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते. मात्र, नोव्हेंबर २०१७ मध्ये ती तरुणी अचानक सागरला सोडून गेली. सागरने तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. काय झाले, माझे काही चुकले का, माझ्यासोबत असे का केले, अशी विचारणा केली. मात्र, तिचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वारंवार तिच्या मोबाईलवर संपर्क सुरु ठेवले. माझे पैसे तरी परत दे, असे तिला म्हटले. त्यानंतर त्या तरुणीने नंदूरबार येथील धडगाव पोलीस ठाण्यात सागरविरुद्ध विनयभंगाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी सागरला अटक केली. महिनाभर सागर कारागृहात होता. तेथून तो अमरावतीत परतला. काय करावे या विवंचनेत तो होता. ती तरुणी अनेकांना फसवित असावी, अशी शंका सागरला आाली. त्यामुळे त्याने शनिवार, २६ मे रोजी फे्रजरपुरा ठाण्यात त्या तरुणीविरुद्ध तक्रार नोंदविली.

तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणाला लाखो रुपयांनी गंडविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार नंदूरबार येथील तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
- आसाराम चोरमले,
पोलीस निरीक्षक, फे्रजरपुरा पोलीस ठाणे

Web Title: 'Modern Girl' was in 'Nada'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.