मोहन तीरथकर विज्ञान, श्रेया अग्रवाल वाणिज्य ‘टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 05:00 AM2020-07-17T05:00:00+5:302020-07-17T05:01:13+5:30

केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे श्रुती अग्रवाल ९७.५३ टक्के व कुणाल कदम ९७.२३ टक्के गुण पटकावित वाणिज्य शाखेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी झळकले. विज्ञान शाखेत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा अर्जुन ठाकूर याने ९७.२३ टक्के, श्रुती घुलक्षे हिने ९६.१२ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून अनुक्रमे द्वितीय, तृतीय स्थान पटकावले. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयात विज्ञान शाखेतून हर्षाली महाजन ही ९५.६९ टक्के व वाणिज्य शाखेतून सिमरन चावला ही ९४.६२ टक्के गुण मिळवून अव्वल राहिली.

Mohan Tirathkar Science, Shreya Agarwal Commerce 'Top' | मोहन तीरथकर विज्ञान, श्रेया अग्रवाल वाणिज्य ‘टॉप’

मोहन तीरथकर विज्ञान, श्रेया अग्रवाल वाणिज्य ‘टॉप’

googlenewsNext
ठळक मुद्देबारावीतही मुलींचीच बाजी : मुली- ९३.४८ टक्के, मुले - ८७.४२ टक्के; जिल्ह्याचा निकाल ९०.३१ टक्के, यंदा ५.८२ टक्क्यांनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल गुरुवारी दुपारी जाहीर केला. जिल्ह्याचा ९०.३१ टक्के निकाल लागला. यावर्षी ५.८२ टक्क्यांनी निकालात वाढ झाली आहे.
स्थानिक श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील मोहन तीरथकर याने विज्ञान तर केशरबाई लाहोटी वाणिज्य महाविद्यालयाची श्रेया अग्रवाल हिने वाणिज्य शाखेतून समसमान ९७.६९ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून टॉपर येण्याचा बहुमान पटकावला. ३५ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३२ हजार ३५८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे श्रुती अग्रवाल ९७.५३ टक्के व कुणाल कदम ९७.२३ टक्के गुण पटकावित वाणिज्य शाखेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी झळकले. विज्ञान शाखेत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा अर्जुन ठाकूर याने ९७.२३ टक्के, श्रुती घुलक्षे हिने ९६.१२ टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून अनुक्रमे द्वितीय, तृतीय स्थान पटकावले. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयात विज्ञान शाखेतून हर्षाली महाजन ही ९५.६९ टक्के व वाणिज्य शाखेतून सिमरन चावला ही ९४.६२ टक्के गुण मिळवून अव्वल राहिली. भारतीय महाविद्यालयातून माही जयस्वाल (८९.५३ टक्के), श्री समर्थ हायस्कूलमधून प्रद्युम्न पांडे (९२.२२ टक्के) अव्वल राहिले. मणीबाई गुजराथी हायस्कूलमधून वाणिज्य शाखेत अंकिता सानप हिने ९२.९२ टक्के, रश्मी बिसेटवार हिने ९२.७७ टक्के, तर प्रतीक्षा शर्मा हिने ९२.६१ गुण पटकाविले. अरुणोदय ज्युनिअर कॉलेजमधून वेदांत देशमुख याने ९४ टक्के, विशाल देशमुख याने ९३ टक्के, सार्थक हिंगलासपुरे याने ९१ टक्के गुण मिळविले.

१२६७६ विद्यार्थ्यांना डिस्टिन्क्शन : जिल्ह्यातून कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी शाखेतून १२ हजार ६७६ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण म्हणजे डिस्टिन्क्शन मिळविले. यात कला ४८६३, विज्ञान ४७४२, एमसीव्हीसी १६४०, तर वाणिज्य १४३१ शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

३८ दिवस निकालास विलंब : गतवर्षी बारावीचा निकाल ८ जून रोजी आला होता. यंदा कोरोनामुळे निकाल तब्बल ३८ दिवस विलंबाने जाहीर करण्यात आला. निकाल केव्हा येणार, याबाबत विद्यार्थ्यांची उत्सुकता ताणली गेली.

मोहनला भारतीय प्रशासकीय सेवेचे आकर्षण
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आकर्षण असल्याने ‘आयएएस’ हेच ध्येय आहे. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी.एस्सी. केल्यानंतर त्याकडे वळणार असल्याचे बारावीत ९७.६९ टक्के गुण मिळवित टॉपर आलेल्या मनोज मुरलीधर तीरथकर म्हणाला. नियमित अभ्यास, नियमित कॉलेज, प्राध्यापक अनिल तायडे यांचे कोचिंग हे यशाचे गमक त्याने सांगितले. त्याला क्रिकेटचा छंद आहे. मोहनचे आई-वडील हे दोघेही शिक्षक, भाऊ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला आहे. हे यश त्याचे स्वत:चे आहे, असे सार्थ उद्गार आई-वडिलांनी काढले.

विज्ञान शाखेचे विद्यार्थी आघाडीवर
यंदा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य, एमसीव्हीसी शाखेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण होण्याबाबत आघाडी घेतली आहे. विज्ञान शाखेतून १२ हजार २९५, कला शाखेतून १२ हजार २३०, वाणिज्य शाखेतून ३ हजार ६४३, तर एमसीव्हीसी शाखेतून ४ शाखेतून १९० उत्तीर्ण झाले आहेत.

श्रेया होणार 'चार्टर्ड अकाऊंटंट'
परीक्षेत ९० टक्क्यांवर गुण मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ९७.६९ टक्के गुण आणि जिल्ह्यातून टॉपर हे स्वप्नवत आहे. खूप आनंद झाला. सी.ए. व्हायचे ध्येय असल्याचे श्रेया अजय अग्रवाल हिने सांगितले. तिचे वडील अजय अग्रवाल हे व्यावसायिक व आई गृहिणी आहे. ती म्हणाली, आई-वडिलांसह कॉलेजचे प्रिंसिपल व शिक्षकांनी कसून सराव घेतला. मोठा भाऊ अमेरिकेत आहे. त्याचे मार्गदर्शन लाभले. सर्व विषयांचा नियमित अभ्यास हे गमक असल्याचे ती म्हणते. क्राफ्ट आणि क्रिएटिव्ह वर्क हा तिचा छंद आहे.

विभागात ६४ कॉपीबहाद्दरांवर कारवाई
अमरावती विभागात ७३ विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी ठपका ठेवण्यात आला. जिल्हानिहाय समितीच्या प्रस्तावावरून यवतमाळ - ३०, वाशिम - १७, अमरावती - ९, बुलडाणा - ६, अकोला - २ अशा ६४ कॉपीबहाद्दरांवर कारवाई केल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव अनिल पारधी म्हणाले.

Web Title: Mohan Tirathkar Science, Shreya Agarwal Commerce 'Top'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.