मोकाट जनावरांचा रस्त्यावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:29+5:302021-07-21T04:10:29+5:30
रेनकोट खरेदीसाठी नागरिकांची लगबग अमरावती : पावसाळा पाहिजे तसा होत नसला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकल्याच्या आजारापासून सुरक्षित राहण्याकरिता ...
रेनकोट खरेदीसाठी नागरिकांची लगबग
अमरावती : पावसाळा पाहिजे तसा होत नसला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकल्याच्या आजारापासून सुरक्षित राहण्याकरिता व पावसापासून बचावाकरिता रेनकोट खरेदीची लगबग नागरिकांमध्ये दिसून येत आहे. दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच राहत असल्याने दुकानात गर्दी वाढू लागली आहे.
--------------------
जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी वाढली
अमरावती : पावसाळा सुरू होताच जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य तपासणी रुग्णांची गर्दी वाढू लागली असून, रोज ३०० ते ४०० चिठ्ठ्या काढण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
-------------------
शहरात नाल्यातून वाहते शेण
अमरावती : शहरात अनेक भागात म्हशीचे तबेले असून, पावसाळ्यात ते शेण कुणी वापरत नसल्याने लगतच्या नालीत टाकले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीसह डासांची उत्पत्ती वाढून आजाराला आमंत्रण मिळत आहे. याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी त्रस्त नागरिकांची आहे.
----------------------
जिल्हा कचेरी ते कॅम्प रस्त्याची दुरवस्था
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू राहत असल्याने या रस्त्याची दैना झाली आहे. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे त्या रस्त्याची दुरुस्ती मागील दोन वर्षापांसून झालेली नाही. संबंधित विभागा आतातरी या रस्त्याकडे लक्ष देतील काय, असा सवाल वाहनधारक करीत आहे.
---------------------------