अभियांत्रिकी, फार्मसी पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा मुहूर्त निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:18 AM2020-12-05T04:18:50+5:302020-12-05T04:18:50+5:30

अमरावती : तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता प्रथम व थेट द्धितीय वर्षे अभियांत्रिकी तसेच प्रथम वर्षे औषधनिर्माणशास्त्र पदविका ...

The moment of admission for the Diploma in Engineering and Pharmacy courses has come | अभियांत्रिकी, फार्मसी पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा मुहूर्त निघाला

अभियांत्रिकी, फार्मसी पदविका अभ्यासक्रम प्रवेशाचा मुहूर्त निघाला

Next

अमरावती : तंत्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता प्रथम व थेट द्धितीय वर्षे अभियांत्रिकी तसेच प्रथम वर्षे औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेशाचा मुहूर्त निघाला आहे. हे प्रवेश दोन फेरीत होणार असून, उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतील, ११ ते १९ डिसेंबर पहिली फेरी, तर २० ते २९ डिसेंबर या कालावधीत दुसरी फेरी घेण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गामुळे तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये बंद आहेत. मात्र, शासनाने हळूहळू शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासकीय तंत्रनिकेतनच्या अभियांत्रिकी, फार्मसी पदविका अभ्यासक्रम प्रवेशाची प्रक्रिया राबविली जात आहे. उमेदवाराला प्रवेशासाठी लॉगीनमधून पाठ्यक्रम, कॉलेज यांचा पसंतिक्रम ऑनलाईन अर्ज सादर करताना पहिल्या फेरीसाठी १२ ते १४ डिसेंबर, तर दुसरी फेरीसाठी २१ व २२ डिसेंबर या दरम्यान नोंदवावा लागणार आहे. प्रवेशाची निश्चिती करताना प्राचार्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केल्याची माहिती तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ, डी.व्ही. जाधव यांनी दिली.

-------------------

अशा होतील दोन प्रवेश फेरी

- प्रथम फेरी : ११ ते १९ डिसेंबर

- दुसरी फेरी: २० ते २९ डिसेंबर

- प्रथम फेरीसाठी अर्ज सादर: १२ ते १४ डिसेंबर

- प्रथम फेरीत पसंतीक्रमांनुसार जागा वाटप- १६ डिसेंबर

- संस्थेत जागा स्वीकृती- १७ व १८ डिसेंबर

- कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित- १७ ते १९ डिसेंबर

- दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन अर्ज: २१ व २२ डिसेंबर

- पसंतीक्रमानुसार जागा वाटप: २४ डिसेंबर

-संस्थेत जागेची स्वीकृती: २५ ते २८ डिसेंबर

- प्रवेश निश्चित: २५ ते २९ डिसेंबर

Web Title: The moment of admission for the Diploma in Engineering and Pharmacy courses has come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.