अमरावती विद्यापीठात पीएच.डी पेट परीक्षेचा मुहूर्त निघाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:25+5:302021-08-29T04:15:25+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०२१-२०२२ या वर्षातील पीएच.डी. पेट परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गत काही ...

The moment of Ph.D. stomach examination started at Amravati University | अमरावती विद्यापीठात पीएच.डी पेट परीक्षेचा मुहूर्त निघाला

अमरावती विद्यापीठात पीएच.डी पेट परीक्षेचा मुहूर्त निघाला

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०२१-२०२२ या वर्षातील पीएच.डी. पेट परीक्षांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गत काही महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया मार्गी लागल्याने पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या नव संशोधकांसाठी ही वार्ता सुखद ठरणारी आहे. १ ते २५ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील केंद्रावरील संगणकावर ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.

पीएच.डी. पेट परीक्षांच्या अनुषंगाने अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यात परीक्षा केंद्रे निश्चित व्हायचे आहे. मात्र, १ सप्टेंबरपासून पीएच.डी. पेट परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविले जात आहे. २५ सप्टेंबरपर्यंतच अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. जनरल, आरक्षित आणि दिव्यांग अशा तीन कॅटेगिरीत पीएच.डी. पेट परीक्षांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन परीक्षा अर्ज भरताना लागणारे शुल्कही पेमेंट गेट वे प्रणालीने ऑनलाईन अदा करावे लागतील. पदव्युत्तर गुणपत्रिका अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अपियर विदयार्थी, जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र, उमेदवारांचे छायाचित्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र जाेडणे अनिवार्य राहील. ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे. दिव्यांगासाठी केंद्रावर नियमानुसार सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणार आहे.

---------------------

पीएच.डी. पेट परीक्षेवर एक नजर

- ६६ विषयात होणार परीक्षा

- जनरल ॲप्टिट्युड आणि पीएच.डी. पेट विषयांचे पेपर प्रत्येकी १०० गुणांचे प्रश्न असेल

- प्रत्येक प्रश्नाला २ गुण मिळतील

- उत्तीर्ण होण्यास ५० गुण आवश्यक राहील.

- विभागात पाच जिल्ह्यात तीन जिल्हे केंद्र चॉईस म्हणून निवडावे लागतील

- एक पेपर ५० गुणांचा असेल

- ऑनलाईन परीक्षा केंद्रावरील संगणावर होईल

- एका पेपरसाठी ९० मिनिटांचा कालावधी असेल.

- ४५ मिनिटात ५० प्रश्न सोडवावे लागेल

- दोन्ही विषयात प्रत्येकी ५० असे उत्तीर्णसाठी १०० गुण लागेल

- पीजी सिलॅबसच्या आधारे परीक्षा होईल.

---------------

पीएच.डी पेट परीक्षा या ऑनलाईन घेण्यात येणार असून, त्या केंद्रावरच संगणकावर होतील. कालातंराने परीक्षा केंद्र निश्चित करण्यात येणार आहे. १ ते २५ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. पीएच.डी. पेट व एम.फिल साठी परीक्षेचे निकष समान असणार आहे.

- हेमंत देशमुख. संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.

Web Title: The moment of Ph.D. stomach examination started at Amravati University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.