प्रादेशिक परिवहन विभागाच्या शिबिराचा मुहूर्त निघाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:17+5:302021-07-04T04:09:17+5:30
अमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे मोटार वाहन निरीक्षकांच्या उपस्थितीत जुलै ते डिसेंबर २०२१ या कालावधीत तालुकास्तरीय शिबिर ...
अमरावती : प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे मोटार वाहन निरीक्षकांच्या उपस्थितीत जुलै ते डिसेंबर २०२१ या कालावधीत तालुकास्तरीय शिबिर आयोजित केले आहे. संबंधित तालुक्यातील नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, दर्यापूर येथे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात २ तसेच ऑक्टोबरमध्ये ४ तारखेला, वरूड तालुक्यात ५ जुलै, १९ जुलै, ४ ऑगस्ट, १७ ऑगस्ट, ६ सप्टेंबर, २० सप्टेंबर, ७ ऑक्टोबर, २० ऑक्टोबर, ८ नोव्हेंबर, १८ नोव्हेंबर, ६ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी तसेच मोर्शीसाठी ७ जुलै, ६ ऑगस्ट, ७ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर, ९ नोव्हेंबर व ८ डिसेंबर रोजी शिबिर होणार आहे.
तिवसा तालुक्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात ९, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ११ व डिसेंबरमध्ये १० तारखेला, अचलपूर तालुक्यात १२ जुलै, २२ जुलै, १० ऑगस्ट, २० ऑगस्ट, १४ सप्टेंबर, २३ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर, २२ ऑक्टोबर, १२ नोव्हेंबर २३ नोव्हेंबर, १३ डिसेंबर व २४ डिसेंबर, धामणगाव रेल्वे तालुक्यात १४ जुलै, १२ ऑगस्ट, १५ सप्टेंबर, १४ ऑक्टोबर, १५ नोव्हेंबर व १५ डिसेंबर, तर धारणी (हरीसाल) साठी १६ जुलै, १३ ऑगस्ट, १७ सप्टेंबर, १८ ऑक्टोबर, १६ नोव्हेंबर व १७ डिसेंबर या तारखेला शिबिर होणार आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात २० जुलै, १८ ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये २१, नोव्हेंबर व डिसेंबर २२ तारखेला शिबिराचे आयोजन होणार आहे. चांदूररेल्वे तालुक्यात २३ जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २४, ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये २५ व २७ डिसेंबरला, चांदूर बाजार तालुक्यात जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये २६ तसेच २७ सप्टेंबर व २८ डिसेंबर रोजी शिबिर होणार आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात २८ जुलै, २७ ऑगस्ट, २९ सप्टेंबर, २८ ऑक्टोबर,२९ नोव्हेंबर, ३० डिसेंबर, तर चिखलदरा तालुक्यात ३० जुलै, ३१ ऑगस्ट, ३० सप्टेंबर, २९ ऑक्टोबर, ३० नोव्हेंबर व ३१ डिसेंबर या तारखेला आरटीओचे शिबिर होणार आहे.
तालुकास्तरीय शिबिराच्या दिवशी शासकीय सुटी असल्यास तो दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार आहे. धारणी येथे नेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्यामुळे तेथील शिबिर कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात हरिसाल येथे पुढील आदेशापर्यंत घेण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी सांगितले.
उपरोक्त तालुकास्तरीय शिबिराच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास तो कॅम्प दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल. तसेच धारणी येथे नेट कनेक्टीविटी उपलब्ध नसल्यामुळे तेथील शिबिर कार्यालय तात्पुरत्या स्वरुपात हरिसाल (डिजीटल व्हीलेज) येथे पुढील आदेशापर्यंत घेण्यात येईल. तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरावती यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.