ऐतिहासिक प्रतापगडावरचे क्षण भारावून टाकणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 05:00 AM2022-02-21T05:00:00+5:302022-02-21T05:00:58+5:30

ऐतिहासिक प्रतापगडावर आज प्रत्यक्षात अनुभवलेले हे ऐतिहासिक क्षण भारावून टाकणारे असल्याच्या भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत रुजविणाऱ्या महिला धोरणाचा मसुदा शिवचरणी अर्पण करून प्रतापगडावर शिवजयंती सोहळा साजरा केला.

Momentary moments on the historic Pratapgad | ऐतिहासिक प्रतापगडावरचे क्षण भारावून टाकणारे

ऐतिहासिक प्रतापगडावरचे क्षण भारावून टाकणारे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि स्वराज्याची नव्याने ओळख देणारा किल्ले प्रतापगड हा अखंड शिवऊर्जेचा स्रोत आहे. 
ऐतिहासिक प्रतापगडावर आज प्रत्यक्षात अनुभवलेले हे ऐतिहासिक क्षण भारावून टाकणारे असल्याच्या भावना राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केल्या. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत रुजविणाऱ्या महिला धोरणाचा मसुदा शिवचरणी अर्पण करून प्रतापगडावर शिवजयंती सोहळा साजरा केला. शिवकार्याची उजळणी म्हणून छत्रपतींच्या महिला धोरणाची सनद त्यांचा हस्ते प्रकाशित करण्यात आली. त्यानिमित्ताने ॲड. ठाकूर बोलत होत्या.
प्रतापगडावरील वातावरण प्रेरणादायी
सूर्याची तेजस्वी-सोनेरी किरणे, मन प्रफुल्लित करणारे वातावरण, आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा नाद, भगव्या-पिवळ्या फुलांची आरास, शिवपालखी सोहळा, शिवध्वजारोहण, भवानीमातेचा अभिषेक आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो,’ असा एकच जयघोष असा किल्ले प्रतापगडावरील हा शिवजयंती सोहळा अंगात नवचैतन्य निर्माण करणारा असाच ठरला. किल्ले प्रतापगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाला आधुनिकतेचा विचार देणारे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतापगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. शिवजयंतीनिमित्त आज तो क्षण पुन्हा जगता आला, हे सर्व प्रेरणादायी आहे, असेही ॲड. ठाकूर म्हणाल्या.

विरोधकांना तगडे प्रत्युत्तर
केवळ स्मारकांच्या मागून राजकारण न करता, समाजकारणाच्या माध्यमातून महिला धोरणासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांचे हे प्रयत्न शिवरायांनी महिलांना समान हक्क, सन्मान, सुरक्षितता मिळावी म्हणून केलेल्या कार्याची उजळणी ठरणार आहेत. महिला धोरणाची अंमलबजावणी म्हणजे शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार मनामनांत आणि घराघरांत पोहोचतील असे हे कार्य असल्याचे ॲड. ठाकूर म्हणाल्या. शिवकार्याची ओळख ही स्वकार्यातून दाखवून देत हा कार्यक्रम म्हणजे अमरावतीतील शिवाजी महाराज पुतळा वादाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना तगडे प्रत्युत्तर मानले जाते. 

 

Web Title: Momentary moments on the historic Pratapgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.