सोमवारी ३९ पॉझिटिव्हची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:50+5:302020-12-15T04:30:50+5:30
----------------------------------------------- ३९० संक्रमितांचे मृत्यू अमरावती : जिल्ह्यात नऊ महिन्यांच्या कोरोना संक्रमणाच्या कालावधीत तब्बल ३९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...
-----------------------------------------------
३९० संक्रमितांचे मृत्यू
अमरावती : जिल्ह्यात नऊ महिन्यांच्या कोरोना संक्रमणाच्या कालावधीत तब्बल ३९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे प्रमाण २.१ असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सोमवारी संक्रमितांच्या मृत्यूची संख्या निरंक राहिल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
-----------------------------------------------------------------
५२ रुग्ण उपचारानंतर बरे
अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत ५२ रुग्णांना उपचारातून बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १७ हजार ८०५ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्हचे प्रमाण ९५.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे.
------------------------------------------------------------------
रग्ण दुप्पटीचे प्रमाण ३१८ दिवसांवर
अमरावती : कोरोनाचे संसर्गात अलीकडे कमी आल्याने रुग्ण दुपटीचा कालावधीदेखील वाढू लागला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना डबलींगचा रेट हा ३१८.५ दिवसांवर पोहोचला आहे. सप्टेंबर महिन्यात हेच प्रमाण धोकादायक प्रमाणात १४ दिवसांवर आले होते.