सोमवार, मंगळवार पुन्हा हलका पाऊस

By admin | Published: April 3, 2016 03:49 AM2016-04-03T03:49:21+5:302016-04-03T03:49:21+5:30

विदर्भ ते कर्नाटकमार्गे खंडित वारे व कमी दाबाची स्थिती निर्माण झाल्यामुळे पुन्हा विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता...

Monday, Tuesday again light rain | सोमवार, मंगळवार पुन्हा हलका पाऊस

सोमवार, मंगळवार पुन्हा हलका पाऊस

Next

हवामानाचा अंदाज : तापमान १ ते २ डिग्रीने वाढणार
अमरावती : विदर्भ ते कर्नाटकमार्गे खंडित वारे व कमी दाबाची स्थिती निर्माण झाल्यामुळे पुन्हा विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. त्यातच तापमान २ ते ३ डिग्रीने वाढणार असल्यामुळे उन्हाचे चटकेसुध्दा सोसावे लागणार आहे.
हवामान तज्ज्ञानुसार पूर्व इराणवर ४.५ किलोमीटर चक्राकार वारे आणि कमी दाबाच्या रुपात पश्चिमी चक्रावात सक्रिय झाले आहे. मध्य पाकिस्तान, गांगेय पश्चिम, बंगाल तसेच आसाम मेघालय आणि बांग्लादेशावर चक्राकार वारे ०.९ ते १.५ किलोमीटर उंचीवर आहेत. उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती असून विदर्भ ते कर्नाटक मार्गे तेलंगणा ०.९ किमी उंचीवर खंडित वारे व द्रोणीय स्थिती आहे. याच प्रभावामुळे येत्या २ दिवसांत तापमानात ३ डिग्री सेल्सिअसने वाढून तापमान ४२ ते ४३ सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यातच ४ व ५ एप्रिल रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

Web Title: Monday, Tuesday again light rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.