पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी दुसरीला पैशांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 10:43 PM2019-07-17T22:43:52+5:302019-07-17T22:44:28+5:30

बडनेरा हद्दीतील एका तरुणीचा पातूर येथील जियाउल्ला खान अताउल्ला खान (४०) याच्याशी विवाह झाला.

The money demand to second wife for the divorce of the first wife in amravati, crime news | पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी दुसरीला पैशांची मागणी 

पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी दुसरीला पैशांची मागणी 

Next

अमरावती : पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेण्यासाठी पतीने दुसऱ्या पत्नीला पाच लाख रुपयांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर येथे घडला. दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

बडनेरा हद्दीतील एका तरुणीचा पातूर येथील जियाउल्ला खान अताउल्ला खान (४०) याच्याशी विवाह झाला. लग्नात चारचाकी वाहन दिले नाही म्हणून पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ सुरू केला. यादरम्यान पतीचे पहिले लग्न झाल्याचे पत्नीला कळले. याबाबत पतीला विचारणा केली असता, त्याने सांगितले, पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. मात्र, ती दहा लाख रुपये मागत आहे. त्यामुळे माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असे जियाउल्लाने दुसऱ्या पत्नीला सांगितले. वडिलांकडे पाच लाख नाहीत, ते अर्धांगवायूने आजारी आहेत, असे दुसऱ्या पीडित पत्नीने पतीसह सासरच्यांना सांगितले. मात्र, त्यांनी तिचे ऐकून न घेता तिलाच घरात डांबून ठेवले आणि मारहाण केली. त्यानंतर दाराला बाहेरून कुलूप लावून निघून गेले. तिने कशीबशी आपली सुटका करून पातूर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली. त्यानुसार ते प्रकरण अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील महिला कक्षाकडे वर्ग झाले. तेथून हे प्रकरण बडनेरा पोलीस ठाण्यात पोहोचले. या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी जियाउल्ला खान अताउल्ला खान, अताउल्ला खान (६२), इमरान खान अताउल्ला खान व चार महिला (सर्व रा. किलाबाग, पातूर, जि. अकोला) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
 

Web Title: The money demand to second wife for the divorce of the first wife in amravati, crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.