एसबीआयच्या आणखी दोन खात्यांतील पैसे उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:07 PM2017-11-07T23:07:11+5:302017-11-07T23:09:13+5:30

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढण्याचा सिलसिला अजूनही सुुरूच आहे.

Money from two other accounts of SBI was flown | एसबीआयच्या आणखी दोन खात्यांतील पैसे उडविले

एसबीआयच्या आणखी दोन खात्यांतील पैसे उडविले

Next
ठळक मुद्देचोरीचा ‘सिलसिला’ सुरूच: दोघांना २ लाख ५८ हजारांचा गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढण्याचा सिलसिला अजूनही सुुरूच आहे. सोमवारी गाडगेनगर व बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन खातेदारांच्या खात्यातून २ लाख ५८ हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी काढल्याचे उघड झाले. त्यामुळे आणखी किती दिवस सिलसिला चालणार, असा वैताग नागरिक व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत १६ जणांच्या बँक खात्यातून परस्पर रक्कम काढल्याच्या घटना घडल्या. त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. पोलीस कसून चौकशी करीत आहेत. मात्र, गुन्हेगारांपर्यंत ते पोहोचले नाहीत. स्टेट बँकेकडूनही चौकशी सुरू असल्याचा गवगवा केला जात आहे. तपासणी करून खातेदारांची रोख परत केली जाईल, अशी ग्वाही बँक अधिकारी देत आहेत. मात्र, अशा पद्धतीने खातेदारांचे पैसे काढले जात असल्यामुळे बँकेच्या विश्वासार्हतेला गालबोट लागले आहे. बँक व्यवहार गोपनीय चालतात, मात्र, अशा घटनांमुळे स्टेट बँकेची गोपनियता चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. स्टेट बँकेच्या एटीएमची सुरक्षा वाºयावर असल्यामुळे खातेदारांच्या खात्याची माहिती लीक झाली आणि नेमके तेच सायबर गुन्हेगाराने हेरल्यामुळे खातेदारांची फसवणूक झाली. स्टेट बँकेच्या हलगर्जीपणाचे गंडांतर बँक खातेदारांवर आले असून, आता एसबीआयच्या खात्यात पुन्हा पैसे टाकण्याविषयी नागरिक साशंक आहेत. मागील काही महिन्यांत १८ जणांचे बँक खाते सायबर गुन्हेगारांनी रिकामे केल्यामुळे असा प्रकार आपल्यासोबतदेखील घडू शकतो, अशी भीती स्टेट बँकेच्या खातेदारांना आहे. त्यामुळे एसबीआयचे अनेक खातेदार खात्यातून पैसे काढण्यासाठी धाव घेत असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपासून स्टेट बँकेत गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे.

बॅक खात्यातून पैसे काढण्याची सर्वाधिक प्रकरणे स्टेट बँकेच्या खातेदारांसोबत घडली आहेत. राठीनगर, बडनेरा व कोतवाली हद्दीतील एसबीआयच्या एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी पाचव्या महिन्यात खातेदारांची माहिती मिळविली होती. मे महिन्यात पहिला गुन्हा उघड झाला होता. सायबर गुन्हेगार माहितीच्या आधारे खात्यातून परस्पर रक्कम काढत आहेत. त्यांना अनेकांच्या एटीएमचे पिन ज्ञात झाले आहेत. त्यामुळे स्टेट बँकेच्या खातेदारांनी एटीएमचे पिन त्वरित बदलविणे गरजेचे आहे. पिन बदलून घेण्याचे आवाहन बँकेकडूनही संबंधित अधिकाºयांनी केले आहे.
सीसीटीव्हीतील टायमिंग तपासणार
सायबर गुन्हेगारांनी राठीनगर, बडनेरा व कोतवालीच्या हद्दीतील एसबीआयच्या एटीएममध्ये स्किमिंग केल्याचा संशय पोलिसांना आहे. अमरावतीच्या सायबर टीमने गुडगावातील १० एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून, ते मंगळवारी अमरावतीत पोहोचले. गुडगावातील एटीएममधून पैसे विड्रॉल करणारे व अमरावतीमधील एटीएममध्ये स्किमिंग करणारे अशा दोन्ही बाजू पोलीस तपासणार आहे. पैसे विड्रॉल करताना दिसणारे चेहरे व स्किमिंग करणाºया चेहरे कोणाचे आहेत, त्यांचा अमरावती व गुडगावशी संबंध काय, आदी बाबींचा उलगडा लवकरच होण्याचे संकेत आहे. फुटेजची पाहणी करू, अशी माहिती सायबर सेलच्या पोलिसांनी दिली.
यांच्या खात्यातून रोख गायब
गाडगेनगर हद्दीतील रहिवासी एक महिला सोमवारी बँकेच्या कामानिमित्त राठीनगरातील स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये गेली होती. त्यांनी पासबूक स्टेटमेंट तपासून पाहिले असता, त्यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार व ८० हजार असे एकूण २ लाख ४० हजारांची रोख विड्रॉल झाल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे सुखदेव झिंगुजी श्रुंगारे (रा. गणेशनगर, बडनेरा) यांच्या भारतीय स्टेट बँकेतील पेंशन खात्यातून १८ हजारांची रोख राज्याबाहेरच्या डुंडहेरा येथील एटीएममधून काढण्यात आल्याचे आढळून आले.

गुडगाव येथील दहा एटीएम फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यांची तपासणी करण्यात येईल. पैसे काढताना दिसणारे व स्किमिंग करणाºयांचे चेहरे स्पष्ट झाल्यावर आरोपी निश्चित होईल. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरेल.
- कांचन पांडे,
सहायक पोलीस निरीक्षक

 

 

Web Title: Money from two other accounts of SBI was flown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.