'कॉमन बर्ड'वर मॉनिटरिंग
By admin | Published: January 11, 2016 12:07 AM2016-01-11T00:07:23+5:302016-01-11T00:07:23+5:30
चिमणी, कावळा, भोरीसारख्या 'कॉमन बर्ड'च्या आजपर्यंत नोंदी घेण्यात आल्या नाहीत. मात्र, आता 'कॉमन बर्ड'ची शास्त्रीय पध्दतीने नोंदी घेण्याचा उपक्रम...
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा उपक्रम : वेक्स संस्थेचा पुढाकार
वैभव बाबरेकर अमरावती
चिमणी, कावळा, भोरीसारख्या 'कॉमन बर्ड'च्या आजपर्यंत नोंदी घेण्यात आल्या नाहीत. मात्र, आता 'कॉमन बर्ड'ची शास्त्रीय पध्दतीने नोंदी घेण्याचा उपक्रम मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हाती घेतला आहे. यामध्ये जिल्ह्यातील कॉमन बर्डच्या नोंदी करण्यासाठी वाईल्डलाईफ अॅन्ड एन्हायर्नमेंट सोसायटीने पुढाकार घेतला आहे.
देशभरातील वन्यप्रेमी व पक्षीप्रेमी विविध प्रजातीच्या पक्ष्यांवर अभ्यास करीत आहेत. मात्र, आजपर्यंत सामान्य पक्षांच्या शास्त्रीय पध्दतीने नोंदी घेतल्या जात नव्हती. त्यामुळे या पक्ष्यांची निश्चित संख्या माहिती होत नव्हती. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने कॉमन बर्ड मॉनिटरिंग कार्यक्रम भारतभर राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षांपासून कॉमन बर्ड मॉनिटरींगला सुरुवात झाली असून अमरावती जिल्ह्यात हा कार्यक्रम वाईल्डलाईफ अॅन्ड एन्हायर्नमेंट सोसायटीने हाती घेतला आहे. हा कार्यक्रम जिल्ह्यातील सात ग्रिडमध्ये राबविल्या जात असून प्रत्येक ऋतूमध्ये पक्षांच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. हिवाळ्यात सामान्यत: पक्षी अभ्यास कार्यक्रम १० जानेवारी रोजीच्या सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत राबविण्यात आला आहे. यासाठी मुंबईच्या बीएनएचएसचे नंदकिशोर दुधे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. समन्वयक व वेक्सचे सचिव जयंत वडतकर यांनी सहभागी पक्षी अभ्यासकांना सामान्य पक्ष्यांच्या प्रजातीबाबत माहिती दिली. प्रत्येक ग्रीडवर २ ते ३ अभ्यासकांनी सामान्य पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. यावेळी पक्षी अभ्यासक किरण मोरे, गजानन वाघ निनाद अभंग, गौरव कडू, सौरभ जवजांळ, विशाल गवळी, अभिजीत साबळे, शुभम वाघ, प्रथमेश तिवारी, प्रतुल गोगटे, अल्केश ठाकरे आदि सहभागी होते. यादरम्यान जवळपास १०० पेक्षा अधिक प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आल्याची माहिती किरण मोरे यांनी दिली.