हायटेन्शन वाहिनीच्या शॉकने माकड मृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 10:11 PM2018-12-27T22:11:51+5:302018-12-27T22:12:04+5:30

माहुली जहागीर ते सोफिया प्रकल्प दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरील हायटेंशन विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन एका पिलाचा मृत्यू झाला, तर दोन माकडे जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. जखमी माकडांवर वन्यजीवप्रेमींनी तात्काळ उपचार केलेत.

Monkey dead in the shock of high-tech channel | हायटेन्शन वाहिनीच्या शॉकने माकड मृत

हायटेन्शन वाहिनीच्या शॉकने माकड मृत

Next
ठळक मुद्देवीजपुरवठा चार वेळा ट्रिप : दोघा माकडांना वन्यजीवप्रेमींनी दिले जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : माहुली जहागीर ते सोफिया प्रकल्प दरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवरील हायटेंशन विद्युत वाहिनीचा स्पर्श होऊन एका पिलाचा मृत्यू झाला, तर दोन माकडे जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. जखमी माकडांवर वन्यजीवप्रेमींनी तात्काळ उपचार केलेत.
माकडांचा कळप गुरुवारी सकाळी ८ वाजता रेल्वे ट्रॅकला लागून असणाऱ्या खांबावर चढला होता. त्यातील एका माकडाच्या शेपटीचा विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे त्याला विजेचा धक्का लागला, तर थोड्याच अंतरावर बसलेली दोन माकडेही वीज प्रवाहाच्या संपर्कात आली. यात एका पिलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन माकडे जखमी झाली. याची माहिती नॅचर फ्रेंडस् ग्रुपचे माहुली जहागीर येथील वन्यजीवप्रेमी आशिष भुंबर, किशोर मेश्राम यांना मिळाली. जखमी माकडांना त्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. पशुवैद्यकीय अधिकारी चंदनसिंह राजपूत यांनी त्यांच्यावर उपचार केले. सुस्थितीत आल्यावर जखमी माकडांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. या घटनाक्रमात २५ केव्ही विद्युत वाहिनी चार वेळा ट्रीप झाली होती. घटनास्थळी रेल्वे कर्मचारी तसेच वनकर्मचारी पोहोचले होते. आशिष भुंबर यांच्या तत्परतेमुळे दोघा माकडांचा या घटनेत जीव वाचला. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती.

Web Title: Monkey dead in the shock of high-tech channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.