चिखलदऱ्यात १० वर्षांत १७ पेक्षा अधिक मृत्यू
By admin | Published: June 20, 2015 12:35 AM2015-06-20T00:35:01+5:302015-06-20T00:35:01+5:30
विदर्भाचे नंदनवन अशी ओळख असलेल्या चिखलदरा येथे पर्यटन सफरीसाठी आलेल्या १० वर्षांत किमान १७ हून अधिक पर्यटकांना विविध पॉइंटवर जीव गमवावा लागला आहे.
पर्यटकांनो सावधान! : अपघात, घातपाताच्या घडतात घटना
नरेंद्र जावरे चिखलदरा
विदर्भाचे नंदनवन अशी ओळख असलेल्या चिखलदरा येथे पर्यटन सफरीसाठी आलेल्या १० वर्षांत किमान १७ हून अधिक पर्यटकांना विविध पॉइंटवर जीव गमवावा लागला आहे. यात अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांचा समावेश आहे.
चिखलदरा पर्यटन समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचावर असून नागमोडीच्या घाटाचा रस्ता आहे. उंच भाग व दऱ्याखोऱ्या असल्याने येथील रस्त्यावरुन वाहने चालविताना चालकांना जीवाची बाजी लावावी लागते. अशात जीवावर बेतण्याची शक्यता असते.
नियमांचे उल्लंघन
चिखलदरा पर्यटन स्थळावरील पॉइंटवर सावधानतेचा इशारा देण्यात आला असताना मोठ्या प्रमाणात आतताईपणा केल्याने अपघाताच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी वैराटा दवाखाडी परिसरातील डोंगरावर प्रतिबंध क्षेत्र असताना वशिष्ट खरात व मृत अश्विनी खरात आदी गेले होते. व्याघ्र प्रकल्पाच्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केले आणि अपघात घडला. पॉइंटवरील लोखंडी बॅरिकेट्स (रेलींग) वहन फोटो काढण्याच्या नादात असे प्रकार घडल्याचे या अगोदरच्या घटनांनी स्पष्ट झाले आहे.
खोल दरीत पडलेला मृतदेह काढण्यासाठी जास्तीत जास्त ४८ तासांचा अवधी लागतो. दऱ्यामध्ये हिंस्त्र प्राणी व इतर सुरक्षाकर्मी सहकारी उतरतात.
- अरुण तायडे,
नगरसेवक न.प. चिखलदरा.
पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांसाठी सूचनांचे फलक लावण्यात आले आहे. पर्यटकांनी दक्ष राहून निसर्गाचा आनंद घ्यावा. तेव्हाच असे अपघात घडणार नाही.
- राजेंद्र सिंह सोमवंशी,
नगराध्यक्ष, न.प. चिखलदरा.