जावईबापूंसाठी सुगीचा ‘अधिक’महिना
By Admin | Published: June 20, 2015 12:51 AM2015-06-20T00:51:44+5:302015-06-20T00:51:44+5:30
अधिकमास म्हटला की, वऱ्हाडात वाण लावायची प्रथा नजरेसमोर येते.
परंपरा : नवविवाहित तरुणांना ‘वाण’ देण्याची पध्दत
जीतेंद्र दखणे अमरावती
अधिकमास म्हटला की, वऱ्हाडात वाण लावायची प्रथा नजरेसमोर येते. याला धोंडा असेही म्हणतात. त्यामुळे १७ जूनपासून जावाईबापूंसाठी सुगीचा महिना सुरु झाला आहे. विशेषत: नवविवाहित तरुणांसाठी सासरवाडीहून भेटवस्तूची अधिक रेलचेल होणार आहे.
सर्वत्र याला मलमास, पुरुषोत्तमास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात. चंद्र वर्ष व सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी वर्गास किंवा ३३ चांद्रमासनंतर चांंद्र वर्षात एक अधिक महिना धरावा लागतो. त्याला अधिकमास म्हणतात. सामान्यत: प्रत्येक चांद्रमासात एक सौर संक्रांती होत असते. ज्या मासात अशी एकही सौर संक्रांती घडत नाही. म्हणजेच जो चांद्रास संपूर्णपणे दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो, तो अधिकमास समजायचा. ज्या सूर्याची मेष संक्रांती चैत्र अमावस्येला घडली व त्याची वृषभ संक्रांती वैशाखात न होता ती त्यापुढील महिन्याच्या प्रतिपदेस घडली तर हा संक्रांती विहितमास अधिक वैशाख ठरेल व त्यापुढचा महिना तर निज वैशाख होईल. चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी आषाढ १८ वर्षांनी भाद्रपद २४ वर्षांनी, आश्विन १४१ वर्षांनी व कार्तिक ७०० वर्षांनी अधिकमास होतो.
भाद्रपद पर्यंतच्या मासांना अधिकमास म्हणतात. आश्विन व कार्तिक अधिक झाले तरी त्यास तसे म्हणत नाहीत. ज्यावर्षी आश्विन अधिक होतो, त्यावर्षी पौष क्षयमास होतो.
अशावेळी दोन पदरांपर्यंत मार्गशीष व दोन पदरानंतर पोष मानून दोन्ही मासांची धर्मक्रये एकाच महिन्यात करतात. या जोड मासाला 'संसर्प' असे म्हणतात. बहुक्षारदीय व पद्य या पुराणात पुरुषोत्तम मासमहात्म व मलमास महात्म या प्रकरणात अधिकमासाचे महत्त्व वर्णीले आहे. त्यात अधिकमासात करायची व्रते, दान उद्यापन यांचा विधी सांगितला असून फलश्रृतीही निवेदिली आहे.
या महिन्यातील देव पुरुषोत्तम म्हणजे विष्णू मानले असून त्याच्या कृपेसाठी पुढील विधी करण्यास सांगितले आहे.
पापसालनासाठी मलमास व्रत प्रत्येक दिवशी अनारसे आदी पक्वान्न ३३ या संधेने कांस्यपालात भरुन त्याचे दान, पादत्राणे व छत्री यांचे दान सुवर्ण दक्षिणा इत्यादी. महाराष्ट्रात अधिकमास अनरशांचे वाण बहुधा जावयाला देतात. कन्या व जावयास लक्ष्मी नारायणास्वरुपी मानले जाते, त्यातून ही पध्दत आली असावी. त्यात जावईबापुंना कपडे, दागिने, भांडी स्वरुपात वस्तू भेट दिली जातात. पंचपक्वान्न व गोड-धोडाच्या जेवणावळी होतात.
अधिकमासात दान, उपवास केले जातात. दीपदान, तांब्याच्या वस्तू, अपुपदान देव ब्राह्मण, जावई, भाचे यांना दिले जाते. गौदान वस्त्रदान करण्यात येते. पोथी, भागवत वाचनदेखील केले जाते.